पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरेंची दांडी?

Covid19 update : आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीला उपस्थित राहणार
CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi
CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi Sarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज संध्याकाळी ४:३० वाजता देशातील कोव्हिड-१९ च्या परिस्थितीवर देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. व्हिडीओ काँनफरसिंगद्वारे हि बैठक पार पडणार आहे. मात्र याच बैठकीला आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत आरोग्यमंत्री राजेश टोपे हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मुख्यमंत्र्यांशी आणि प्रमुखांशी संध्याकाळी ४:३० वाजता कोविड १९ संसर्ग प्रतिबंध संदर्भात चर्चा करणार आहेत. या बैठकीत संबंधित राज्यातील कोरोना रुग्णांची सद्यस्थिती, राज्यांनी लागू केलेले निर्बंध, राज्यातील आरोग्य व्यवस्था, ऑक्सिजनची उपलब्धता या आणि अशा विविध विषयांबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

मात्र आता याच ऑनलाईन बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहाणार नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आँनलाईन बैठकली उपस्थित राहाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीला का उपस्थित रहाणार नाहीत या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in