BJP C Voter Servey: उद्धव ठाकरे वाढवणार अमित शहांचे टेन्शन; काय आहे कारण?

2024 च्या लोकसभा निवडणूण भाजपला दोन राज्यांमध्ये खूप कठीण जाऊ शकते. सर्वेक्षणाचे आकडे भाजपला निश्चितच चिंतेत टाकणारे आहेत
BJP C Voter Servey
BJP C Voter Servey

या वर्षी 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भाजपने कंबर कसली आहे.

भाजपने सर्वच राज्यात निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकांवर नजर टाकली तर अशी दोन राज्ये आहेत जी भाजपसाठी डोकेदुखी ठरु शकतात. यात बिहार आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा समावेश आहे. भाजप नुकत्याच केलेल्या सी व्होटरच्या ताज्या सर्वेक्षणानुसार काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

यूपीएच्या मतांची टक्केवारी वाढली

बिहार आणि महाराष्ट्रात भाजपला आव्हान मोठे असणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शह देण्यासाठी बिहार आणि महाराष्ट्रात गळ्यात गळे घालून लढत आहे. सी व्होटरच्या ताज्या सर्वेक्षणानुसार, यूपीएला महाराष्ट्रात ४८ टक्के मतं मिळत आहेत. त्याचवेळी बिहारमध्येही यूपीएची स्थिती भक्कम असल्याचे दिसून येत आहे. येथे यूपीएला ४७ टक्के मतं मिळत आहेत.

महाराष्ट्र विधानसभेतील मतांची टक्केवारी कशी ?

महाराष्ट्रात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 122 जागांवर निवडणूक लढवली आणि 105 जागा जिंकल्या. राज्यात भाजपला .75 टक्के मते मिळाली. दुसरीकडे, त्यावेळी एनडीएचा भाग असलेले उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाने 63 जागांवर निवडणूक लढवली आणि 56 जिंकल्या. त्यावेळी यूपीएला 16.71 टक्के मते मिळाली होती.

भाजपने दोन्ही राज्यात संवेदनशील जागांवर लक्ष

भाजपने बिहार आणि महाराष्ट्रातील संवेदनशील जागांची यादी केली आहे. बिहारमध्ये नवादा, वैशाली, वाल्मिकी नगर, किशनगंज, कटिहार, सुपौल, मुंगेर, झांझारपूर, गया आणि पूर्णिया या जागा पक्षाच्या संवेदनशील जागांच्या यादीत आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रातील शिर्डी, रत्नागिरी आणि मावळसारख्या जागा भाजपने संवेदनशील जागांच्या यादीत ठेवल्या आहेत.

उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत वार केला

गेल्या महिन्यात जपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. भाजपच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले. सत्तेच्या लालसेपोटी ठाकरेंनी आपल्या विचारसरणीशी तडजोड केल्याची टीका यावेळी नड्डा यांनी केली.

अवघड जागांवर भाजपचे लक्ष

उद्धव ठाकरें सोबतचे संबंध तुटल्यानंतर आता भाजपसमोर मोठे आव्हान असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिथे गेल्या वेळी पक्षाला मोठा फटका बसला होता अशा महाराष्ट्रातील 18 जागांवर भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लक्ष्य ठेवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com