Uddhav Thackeray : राहुल गांधींची खासदारकी रद्द; उद्धव ठाकरेंनी घेतला भाजपचा समाचार

Rahul Gandhi News : राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला
Rahul Gandhi and Uddhav Thackeray
Rahul Gandhi and Uddhav ThackeraySarkarnama

Congress News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळे राहुल गांधींना सुरत न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवलं आहे.

या प्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली. गांधींची खासदारकी रद्द करण्यात आल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Rahul Gandhi and Uddhav Thackeray
Rahul Gandhi : राहुल गांधींनी ‘तो’ वटहुकूम फाडला नसता तर आज त्यांची खासदारकी वाचली असती...

राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत भाजपचा चांगलाच समाचार घेतला. ठाकरे म्हणाले,''चोराला चोर म्हणणं हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. लोकशाहीच्या अंताची ही सुरुवात असून सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. आता लढाईला दिशा द्यावी लागेल'', असे ट्विट करत ठाकरेंनी संताप व्यक्त केला.

राहुल गांधींची खासदारी का रद्द झाली?

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेल्या टिप्पणीमुळे गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

त्यानंतर लगेच त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला. मात्र, न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. यानंतर काँग्रेसला मोठा धक्का धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com