दहशतवाद्यांचा धुमाकूळ; श्रीनगरमध्ये दोन शिक्षकांची हत्या...पाच दिवसांत सात मृत्यू

दोन शिक्षकांमध्ये एक काश्मिरी पंडित आणि एका शीख महिलेचा समावेश आहे.
Jammu and Kashmir.
Jammu and Kashmir.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला असून मागील पाच दिवसांत सात नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी गुरूवारी श्रीनगरमध्ये एका महिलेसह दोन शिक्षकांची हत्या केली. काश्मीरमध्ये 48 तासांच्या आत झालेली ही दुसरी घटना आहे. दोन दिवसांपूर्वीच एका औषध विक्रेत्यासह तीन नागरिकांची हत्या करण्यात आली आहे.

दोन शिक्षकांमध्ये एक काश्मिरी पंडित आणि एका शीख महिलेचा समावेश आहे. गुरूवारी सकाळी 11.15 च्या सुमारास श्रीनगर जिल्ह्यातील संगम ईदगाह येथील सरकारी शाळेतील दोन शिक्षकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले. महिला शिक्षिका शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. सुखविंदर कौर असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये चार ते पाच शिक्षकांची बैठक सुरू असतानाच दहशतवाद्यांनी हल्ला केला.

Jammu and Kashmir.
ज्ञानेश्वर पाटील, महेश गावित यांना लोकसभेची उमेदवारी

या बैठकीत उपस्थित असलेल्या मुस्लिम शिक्षकांना दहशतवाद्यांनी वेगळं केलं. त्यानंतर कौर यांच्यासह दुसऱ्या हिंदू शिक्षकाला शाळेबाहेर आणत गोळीबार केल्याचे समजते. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. श्रीनगरमधून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी येत आहे. यावेळी शहरातील दोन शिक्षकांची हत्या करण्यात आली आहे. या अमानवी हल्ल्याचा केवळ निषेध करून चालणार नाही, असं ट्विट अब्दुल्ला यांनी केलं आहे.

मागील पाच दिवसांत दहशतवाद्यांनी सात जणांची हत्या केली आहे. मंगळवारी श्रीनगरमधील प्रसिध्द उद्योजक व औषध विक्रेते माखन लाल बिंद्रो यांची हत्या करण्यात आली होती. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास 70 वर्षीय बिंद्रो यांच्या दुकानातच दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

बिंद्रो हेही काश्मिरी पंडित होते. 1990 च्या दशकात दहशतवादी कारवायांनी टोक गाठलेलं असतानाही बिंद्रो यांनी काश्मीर सोडले नव्हते. ते तिथेच राहून औषध दुकान चालवत होते. मंगळवारी बिंद्रो यांच्यासह आणखी दोघांची हत्या करण्यात आली होती. श्रीनगरमधील एक फळ विक्रेता व बंदीपुरातील एका नागरिकाचा त्यामध्ये समावेश आहे. ते मोहम्मद शफी असून येथील एका टॅक्सी स्टँडचे अध्यक्ष होते. तर फळ विक्रेत्याचे नाव विरेंदर पासवान असून ते बिहारचे रहिवासी होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com