मास्क घातला नाही म्हणून महिलेला मारहाण करणारे दोन पोलीस अखेर बसले घरी!

देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात कडक उपाययोजना करण्यात येत आहेत.
two police personal suspended for beating woman for not wearing mask
two police personal suspended for beating woman for not wearing mask

भोपाळ : देशातील कोरोना (Covid19) संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध (Lockdown) लादण्यात आले आहेत. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई असून, मास्क (Mask) घालणे बंधनकारक आहे. परंतु, भाजी खरेदीसाठी गेलेल्या महिलेला केवळ मास्क घातला नाही म्हणून भरबाजारात पोलिसांनी (Police) मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अखेर दोन पोलिसांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. 

ही घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात जिल्ह्यातील राहली येथे घडली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संबंधित महिला मुलीसमवेत भाजी खरेदी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिने मास्क घातला नव्हता. यामुळे पोलिसांनी तिला बेदम मारहाण केली होती. तिच्या मुलीने पोलिसांनी अनेक वेळा विनवणी करुनही पोलिसांनी मारहाण सुरू ठेवली होती. 

या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली होती. याची दखल अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच, या प्रकरणी चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. 

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही महिला पोलिसासह काही पुरुष पोलीस कर्मचारी एका महिलेला मारहाण करताना दिसत आहेत. ते तिला जमिनीवर खाली पाडून केसाला पकडून तिला फरफटत ओढून नेतानाही दिसत आहेत. तिला पोलीस जीपमध्ये बसवण्याचा प्रयत्न करीत असताना ती विरोध करीत आहे आणि पोलीस तिला मारहाण करीत आहेत. 

पोलिसांनी मात्र, या प्रकरणात आपली चूक नसल्याची भूमिका घेतली होती. पोलिसांनी म्हटले होते की, संबंधित महिलेने मास्क न घातल्याने आम्ही तिला अडवले. तिला खुल्या कारागृहात शिक्षा देण्यासाठी आम्ही नेत असतानी तिने विरोध केला. तसेच, आमच्या एका महिला पोलिसाला मारहाण केली. 

राहलीचे उपविभागीय अधिकारी कमलसिंह म्हणाले होते की, व्हिडीओमध्ये केवळ अर्धाच भाग आहे. त्या महिलेने सुरवातीला महिला पोलिसाला मारहाण केली. संबंधित महिला पोलिसाच्या तोंडावर जखमा झाल्या आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com