मंत्रिमंडळ विस्ताराआधीच वादाची ठिणगी; आमदाराचा थेट प्रियांका गांधीवर निशाणा

राजस्थानात काही वेळातच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
Congress
CongressSarkarnama

नवी दिल्ली : पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलानंतर मोठा भूकंप झाला होता. माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत दुसरा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. आता रविवारी राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. पंजाबमधील राजकीय वादळाच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार होत असल्याने काँग्रेस नेतृत्वानं सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यानंतर विस्ताराच्या काही तास आधीच दोन आमदारांनी बंड केले आहे.

राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील आमदार जौहरी लाल मीना (Jahari Lal Meena) आणि आमदार साफिया (Saphia) अशी या आमदारांची नावे आहेत. आम्ही जन्मजात निष्ठावान राहूनही सरकारने भ्रष्ट मंत्र्यांना अधिक संधी देत एकप्रकारे भ्रष्टाचारालाच समर्थन दिल्याचा आरोप या आमदारांनी केला आहे. टिकाराम जुलाई (Teekaram Julie) यांना मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावरून कॅबिनेट मंत्रीपदी बढती देण्यात आली आहे.

Congress
ठाकरे, पवारांसह अनेकांचा तावडेंना आला होता फोन; पण कुणीच हिंमत केली नाही...

जुलाई यांच्या मंत्रिमंडळातील सहभागालाच दोन आमदारांनी विरोध केला आहे. तसेच साफिया यांनी थेट प्रियांका गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. प्रियांका यांनी उत्तर प्रदेशात 40 टक्के महिलांना तिकीट देणार असल्याचे म्हटले आहे. पण राजस्थानमध्ये महिलांचा सहभाग वाढत नाही. काँग्रेसच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृतीत फरक असल्याची टीका साफिया यांनी केली आहे.

मीना यांनी जुलाय यांच्यावर टीका केली आहे. अलवर जिल्ह्यात टिकाराम जुलाय हे भ्रष्ट व्यक्ती असल्याचे आणि त्यांचे कुटुंब वसुलीमध्ये सहभागी असल्याचे सर्वांना माहिती आहे. त्यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी मी पक्षाकडे केली होती. पण त्यानंतरही त्यांना पद देण्यात आलं. मी त्याविरोधात आहे, असं मीना म्हणाले.

Congress
सरकारी कंपनीचं दातृत्व; मुलीच्या उपचारासाठी कर्मचाऱ्याला दिले तब्बल सोळा कोटी

दरम्यान, राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वादावर तोडगा निघाला आहे. राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असून, पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री गेहलोतांनी सगळ्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला आहे. आज सायंकाळी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात 15 नवीन चेहऱ्यांना स्थान दिले जाणार असून, त्यातील 4 राज्यमंत्री असतील.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रभारी अजय माकन हेसुद्धा जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. गेहलोत यांनी मंत्रिमंडळाची तातडीने बैठक काल सायंकाळी बोलावली होती. या बैठकीत सगळ्या मंत्र्यांचे राजीनामे त्यांनी घेतले आहेत. राजस्थानच्या मंत्रिमंडळात सध्या 21 संख्या असून आणखी 9 मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो. यात पायलट समर्थक ५ आमदारांची वर्णी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com