जेएनयु'त पुन्हा राडा; पूजा आणि इफ्तार पार्टीतील मांसाहारावरुन वातावरण पेटले

New Delhi| JNU| Ramnavami| Iftar Party| अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या विरूध्द पोलिसांत तक्रार दाखल
जेएनयु'त पुन्हा राडा; पूजा आणि इफ्तार पार्टीतील मांसाहारावरुन वातावरण पेटले
New Delhi| JNU|Twitter/@ANI

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरुन चर्चेत असते. दोन वर्षांनंतर शाळा महाविद्यालये सुरु झाल्यानंतर आता पुन्हा जेएनयुमध्ये वाद उफाळला आहे. रामनवमीच्या दिवशी मांसाहारास परवानगी, इफ्तार पार्टीत मांसाहारी पदार्थांना विरोध आणि पूजा केल्याच्या मुद्यावरून जेएनयूत झालेल्या हिंसाचारामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. (JNU Voilence latest news)

या मुद्द्यावरुन डाव्या विद्यार्थी संघटनांनी आज दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर अभाविपच्या हिंसाचाराविरूध्द प्रदर्शने केली. दुसरीकडे भाजपने हा हिंसाचाराचा मुद्दा माकप सरचिटणीस सीताराम येच्युरी यांची त्या पक्षाच्या सर्वोच्च नेतेपदी पुन्हा निवड होण्याबरोबर जोडला आहे. जेएनयू हा डाव्या चळवळीचा गड मानला जातो.

New Delhi| JNU|
वनवास भोगल्याशिवाय..! राज ठाकरे भेटीनंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट व्हायरल

जेएनयूतील कावेरी वसतीगृहाच्या मेसमध्ये काल दुपारी हा वाद पेटला व त्यातून रात्री दोन गटांत तुफान राडा झाला. यातील हिंसाचाराचा एक नवा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. रामनवमीच्या दिवशी आपण विद्यापीठातील मांसाहाराच्या मुद्यावर आक्रमक रहाणार असल्याचे अभाविपने शनिवारीच जाहीर केले होते. जेएनयूतील ‘फ्री सेक्स' सह अनेक मद्यांवर अभाविपने वारंवार तीव्र विरोध केलेला आहे. मोदी सरकारने विद्यापीठाच्या कुलगुरूपदी शांतिश्री पंडित यांची नियुक्ती केल्यानंतर वातावरण पुन्हा तप्त बनू लागले आहे. पाठोपाठ आता मांसाहाराचा मुद्दा तापला आहे. यापूर्वी डाव्या विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमात कथीत देशविरोधी घोषणा दिल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून सध्या कॉंग्रेसवासी झालेले विद्यार्थी नेते कन्हैय्या कुमार त्या प्रकरणात सध्या जामीनावर आहेत.

कावेरी वसतीगृह हे विकलांग विद्यार्थ्यांसाठी आहे. अभाविपने हिंसाचार परसविल्यावरून एसएफआ, डीएसएफ व एआयएसए या डाव्या संघटनाच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांविरूध्द पोलिसात धाव घेतली.अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या विरूध्द पोलिसांत तक्रार दाखल झाली. दिल्ली पोलिसांनी अज्ञात विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

New Delhi| JNU|
मलिकांसह अबू आझमी अन् अस्लम शेख यांच्या मतदारसंघात भाजपची 'फिल्डींग'

रामनवमीच्या दिवशी कावेरीच्या मेसमध्ये मांसाहारी जेवण बनवू नये असा दबाव भाजपने आणला त्याला डाव्या संघटनांनी विरोध केला. राज्यघटनेने दिलेल्या ‘खाण्याचा हक्क' या मुलभूत अधिकाराविरोधात अबाविपची ही दंडोली सुरू असल्याचे डाव्या विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे. रामनवमीनिमित्त होमहवन सुरू असताना डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी हल्ला केल्याचा अभाविपचा आरोप आहे. यात किमान १८ विद्यार्थी जखमी झाले आहेत. काल या मेसवर दगडफेक झाली त्यात काचा फुटल्या व अनेक विद्यार्थीही जखमी झाले.

अभाविपचे जेएनयू अध्यक्ष रोहित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, साडेतीन वाजता रामनवमीच्या पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी साडेपाचला विरोध सुरू केला व रात्री साडेआठनंतर सशस्त्र विद्यार्थ्यांनी अभाविप कार्यकर्त्यांवर हल्ला केला. त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. जेएनयूमधील इफ्तार पार्टीत कधीही मासाहारी पदार्थ बनविले जात नाहीत. केवळ कस्टर्ड, फळफळावळ ठेवली जाते. मात्र यंदा मुद्दाम तसे केले गेले. रामनवमीला आमच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने हे कारस्थान केले गेले. जेएनयूला बदनाम करण्यासाठी डाव्या संघटनांनी केलेले हे कारस्थान असल्याचाही त्यांनी आरोप केला. जेएनयूमध्ये डाव्या संघटनांच्या पायाखालची जमीन वेगाने घसरू लागल्यानेच त्यांचा हिंसाचार सुरू असल्याच त्यांनी सांगितले.

दुसरीकडे माजी अध्यक्षा एन साईबाला यनी, अभविप च्या गटाने आम्हाला मारहाण केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की कोणाला मांसाहार करायचा नसेल तर त्यांनी करू नये पण दुसऱयावर तसे लादण्याचा अभाविपचा प्रकार घटनाबाह्य व हिंसाचाराचा आहे. रामनवमीला मासाहारावर बंदी साऱया देशात कोठेही नसते. हिंदू-मुस्लिम ॲंगल जोडण्यासाठीच अभाविपने हा बनाव रचल्याचा आरोप त्यांनी केला. कावेरीच्या जेवणाच्या ठेकेदाराला अभाविपकडून सातत्याने धमक्या मिळत होत्या. घटनेवेळी पोलिस विद्यापीठात हजर असूनही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप करत डाव्या संघटनांच्या सुमारे अडीचशे विद्यार्थ्यांनी वसंत कुंज पोलिस ठाण्याला काल रात्री घेराव घातला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in