before two days of death actor vivek had taken covid vaccine shot
before two days of death actor vivek had taken covid vaccine shot

मृत्यूच्या दोन दिवस आधीच अभिनेते विवेक यांनी घेतली होती कोरोनाची लस

तमिळ चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते विवेक यांचे हृदय विकाराने आज पहाटे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

चेन्नई : तमिळ चित्रपटसृष्टीतील विनोदी अभिनेते विवेक (वय 59) यांचे आज पहाटे हृदय विकाराने निधन झाले. त्यांना काल (ता.16 ) हृदय विकाराचा झटका आल्याने चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, त्यांचा आज पहाटे मृत्यू झाला. विवेक यांनी दोनच दिवसांपूर्वी कोरोना लस घेतली होती. परंतु, त्यांच्या हृदय विकाराचा लस घेण्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा तमिळनाडूच्या आरोग्य सचिवांनी केला आहे. 

तमिळनाडू सरकारच्या वतीने कोरोना लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर कार्यक्रम 15 एप्रिलला घेण्यात आला होता. या कार्यक्रमात विवेक यांनी कोरोना लस घेतली होती. काल त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये शंभर टक्के ब्लॉकेज आढळले असून, याचा लसीकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले जात आहे. 

विवेक यांच्या मृत्यूनंतर त्यांनी घेतलेल्या कोरोना लसीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांनी त्यांच्या मृत्यूचा संबंध कोरोना लशीशी जोडला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना तमिळनाडूच आरोग्य सचिव डॉ. राधाकृष्णन म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी विवेक यांनी पुढाकार घेतला होता. याचमुळे ते लस घेण्यास पुढे आले होते. लस घेण्याचा त्यांच्या हृदय विकाराशी कोणताही संबंध नाही. 

अतिशय लोकप्रिय असलेल्या विवेक यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विवेक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, विवेक यांच्या अकाली निधनाने अनेक जणांना धक्का बसला आहे. त्यांच्या विनोदी अभिनयामुळे लोकांचे मनोरंजन झाले. त्यांचे चित्रपट आणि आयुष्य या दोन्ही गोष्टींतून त्यांची समाजाप्रतीची कटिबद्धता दिसून येते. त्यांचे कुटंबीय, मित्र आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. 

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला आहे. देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे.

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com