टि्वटमुळे सुप्रीम कोर्टातील हे ज्येष्ठ वकील ठरले दोषी  

प्रशांत भूषण यांनी केलेल्या दोन टि्वटमुळे सुप्रीम कोर्टचा अपमान झाल्याच्या आरोप त्यांच्यावर आहे.
1Prashant_Bhushant.jpg
1Prashant_Bhushant.jpg

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचा अपमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टातील प्रसिद्ध ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने दोषी ठरविले आहे. सुप्रीम कोर्टोचे न्यायाधीश अरूण मिश्रा, बी.आर. गवई, कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. याबाबत येत्या 20 तारखेला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 

या खटल्याचा निकाल 5 तारखेला सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला होता. प्रशांत भूषण यांनी केलेल्या दोन टि्वटमुळे सुप्रीम कोर्टचा अपमान झाल्याच्या आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्याविरोधात दाखल झालेली याचिका सुनावणीसाठी अयोग्य असल्याची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या खटला अन्य खंडपीठाकडे चालविण्यात यावा, ही मागणीही न्यायालयाने अमान्य केली आहे. 

वकील प्रशांत भूषण यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले की त्या टि्वटमुळे मुख्य न्यायाधीशाचा अपमान झालेली नाही किंवा त्यांच्या प्रतिष्ठेलाही धक्का लागलेला नाही. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी प्रशांत भूषण यांना नोटिस पाठवून याबाबत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. याबाबत प्रशांत भूषण यांनी कोर्टात 140 पानांचे आपले म्हणणे सादर केले आहे. आपल्या टि्वटमुळे मुख्य न्यायाधीश किंवा न्यायालयाचा अपमान झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. या दोन टि्वटमुळे सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार हे 20 तारखेला कळणार आहे.   

पुणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारकडुन देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. पुण्यातील आठ पोलिस अधिकाऱ्याना उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पुणे पोलिस दलातील परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, कोथरुड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुषमा चव्हाण, पोलिस उपअधिक्षक अनिल पाथरुडकर, रेल्वेच्या पुणे विभागातील पोलिस उपअधिक्षक नरेंद्रकुमार गायकवाड, दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाची सुनील यादव व राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ ग्रुप एक) असिस्टंट कमांडंट सादिकअली सय्यद यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com