तेलंगणात टीआरएसने भाजपला चारली धूळ; केसीआर यांनी गड राखला

Assembly by-election results : देशातील सात मतदारसंघात विधानसभा पोट निवडणूक झाली.
K Chandrasekhar Rao, Narendra Modi
K Chandrasekhar Rao, Narendra Modisarkarnama

Assembly by-election results : देशातील सात मतदारसंघात विधानसभा पोट निवडणूक झाली. त्याचा निकाल आज (ता. ६) जाहीर झाला आहे. यामध्ये बिहारमधील गोपालगंज, मुंबईतील अंधेरी पूर्व, हरियाणातील आदमपूर, तेलंगणातील मुनुगोडे, मध्यप्रदेशातील गोकरनाथ आणि ओडिशातील धामनगर मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकींचा समावेश आहे.

बिहारमधील मोकामा मतदारसंघात आरजेडीच्या उमेदवार नीलम देवी विजयी झाल्या आहेत. तर गोपालगंजमधून भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपचे (BJP) उमेदवार गोला यांनी गोकर्णनाथ मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. हरियाणाच्या आदमपूर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार बिश्नोई विजयी झाले आहेत. ओडिशातील धामनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सूर्यवंशी सूरज आघाडीवर आहेत.

K Chandrasekhar Rao, Narendra Modi
मशालीने पुन्हा एकदा इतिहास रचला; BMC निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंना बुस्टर!

मात्र, या सर्व निवडणुकीमध्ये सर्वाधिच चर्चा झाली ती तेलंगणातील (Telangana). येथे मुनुगोडे विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण 2 लाख 41 हजार 805 मतदारांपैकी 93 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. या निवडणुकीत भाजप आणि टीआरएसमध्ये (TRS) चांगलीच टक्का पाह्यला मिळाली. या अटितटीच्या निवडणुकीमध्ये तेलंगणा केसीआर यांचा टीआरएस पक्षाला विजय मिळालाआहे.

K Chandrasekhar Rao, Narendra Modi
Nanded : प्रकाश आंबेडकर म्हणाले, काॅंग्रेसचे आता काहीच शिल्लक राहिलेले नाही..

टीआरएसचे उमेदवार पहिल्या फेरीपासून 4000 पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत भाजप आणि टीआरएसमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली होती. शेवटी टीआरएसने या निवडणुकीत बाजी मारली आहे. असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in