प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळताच उपमुख्यमंत्री अन् मंत्र्याकडून बैठकीतच तोडफोड

प्रदेशाध्यक्षांना मुख्यमंत्रिपद मिळाल्याने नाराजी उफाळून आली
BJP Tripura
BJP Tripura Sarkarnama

आगरतळा : त्रिपुराचे (Tripura) मुख्यमंत्री विप्लवकुमार देव (Biplab Kumar Deb) यांना डच्चू देण्यात आला आहे. भाजपने (BJP) डॉ.माणिक साहा (Manik Saha) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली आहे. साहा हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे, मागील महिन्यातच भाजपकडून साहा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. आता साहा यांना मुख्यमंत्रिपद मिळाल्यानं नाराजी उफाळून आली आहे. पक्षाच्या बैठकीतच उपमुख्यमंत्री आणि एका मंत्र्यानं खुर्च्यांची मोडतोड केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, भाजपमधील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची 14 मे रोजी बैठक झाली. या बैठकीत साहा यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा आणि राम प्रसाद पॉल यांनी निषेध व्यक्त केला. त्यांनी बैठकीत खुर्च्या आपटून तोडल्या. त्यांनी साहा यांच्या नावाला आक्षेप घेतला होता. विशेष म्हणजे, काल (ता.15) मुख्यमंत्री म्हणून साहा यांनी राजभवनावर शपथ घेतली. या शपथविधीला वर्मा आणि पॉल हे उशिरा पोचले. त्यामुळे भाजपमधील वाद अद्याप शमलेला नसल्याचे समोर आले.

खासदार डाॅ. साहा यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करुन भाजपने धक्कातंत्र वापरलं आहे. डाॅ. साहा मागील निवडणुकीनंतर भाजपशी जोडले गेले होते. ते मागील महिन्यात 3 तारखेला राज्यसभा खासदार बनले. यानंतर महिनाभरातच भाजप नेतृत्वाने त्यांची त्रिपुरात मुख्यमंत्री म्हणून निवड करण्याची खेळी खेळली आहे. कर्नाटक, उत्तराखंड, गुजरातप्रमाणे भाजपने त्रिपुरात रणनीती आखली आहे. याचबरोबर मंत्रिमंडळातही फेरबदल करण्यात आले आहेत.

BJP Tripura
मोठी बातमी : भाजपकडून एकाला डच्चू काही तासांतच दुसरा मुख्यमंत्री

त्रिपुरात सत्तेत आल्यानंतर देव यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आज त्यांनी तडकाफडकी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून विनोद तावडे (Vinod Tawde) आणि भूपेंद्रकुमार यादव राज्यात दाखल झाले होते. यानंतर पक्षाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून डॉ. माणिक साहा यांच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब झालं होतं. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर पक्षाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

BJP Tripura
तावडेंवर मोठी जबाबदारी! नवीन मुख्यमंत्री निवडीसाठी तातडीनं रवाना

त्रिपुरात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होत आहे. निवडणुकीला सुमारे वर्षभराचा कालावधी असतानाच मुख्यमंत्रिपदावरून देव यांना हटवण्यात आलं. राज्यातील भाजपमध्ये गटबाजी उफाळून आल्यानं पक्ष नेतृत्वानं हे पाऊल उचललं आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी देव यांना दिल्लीला पाचारण करण्यात आलं होतं. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. त्याचवेळी देव यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झालं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com