काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गाडीवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांचा हात असल्याचा दावा

हल्यातपिजुष बिस्वासकिरकोळ जखमी झाले असून हा हल्ला सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचा दावा त्यांनी केला. या हल्ल्यात काही कार्यकर्तेही जखमी झाले आहेत.
Tripura Congress Chief's Car Attacked By BJP Supporters
Tripura Congress Chief's Car Attacked By BJP Supporters

अगरतळा : त्रिपुरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पिजुष बिस्वास यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात ते किरकोळ जखमी झाले असून हा हल्ला सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनीच केल्याचा दावा त्यांनी केला. हल्लाच्या ठिकाणी पोलिस हजर असतानाही हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक झाली होती. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला होता. या हल्ल्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यपध्दतीवर भाजपने सडकून टीका केली. असाच प्रकार आता त्रिपुरामध्ये घडला आहे. राज्याची राजधानी असलेल्या अगरतळापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर बिस्वास यांच्यावर हल्ला झाला आहे. पक्षाच्या बैठकीसाठी ते याठिकाणी गेले होते.

या हल्लाची छायाचित्रेही समोर आली आहेत. यामध्ये बिस्वास यांच्या गाडीची समोरील काच फुटली असून गाडीमध्ये व परिसरात काचांचे तुकडे पडल्याचे दिसत आहे. या हल्लात बिस्वास यांच्यासह काँग्रेसचे काही कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. बिस्वास यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली असून त्याचा तपास सुरू आहे. पण अद्याप या हल्लाचे कारण समोर आलेले नाही. 

डिसेबंर 2019 मध्ये बिस्वास यांच्यावर प्रदेशाध्यपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यामध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पदभार स्वीकारल्यापासून ते राज्यभर फिरून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर देत आहेत. केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात शुक्रवारी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्वही त्यांनी केले. अगरतळा येथील महात्मा गांधी पुतळा ते राजभवनपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. 

मागील महिन्यात त्रिपुरातील विरोधी पक्षनेते माणिक सरकार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या पुर्वनियोजित हल्ल्यांसाठी भाजपाला जबाबदार धरले होते. कृषी कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल होता. भाजपचे प्रवक्ते नबेंदु भट्टाचार्य यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. याउलट कम्युनिस्ट पक्षाचे (एम) कार्यकर्तेच भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करत असल्याचा पलटवार त्यांनी केला. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com