प्रतिष्ठेच्या लढतीत काँग्रेसनं भाजपला चारली धूळ; चार वर्षांनी पुन्हा गड केला काबीज

त्रिपुरामध्ये विधानसभेच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला तीन जागा मिळाल्या.
Congress Latest News, BJP Latest Marathi News, Tripura Bypoll Result
Congress Latest News, BJP Latest Marathi News, Tripura Bypoll ResultSarkarnama

नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये विधानसभेच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने (BJP) चारपैकी तीन जागा जिंकत बाजी मारली आहे. पण प्रतिष्ठेच्या ठरलेल्या आगरतळा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. राज्याच्या राजधानीतच भाजपला काँग्रेसनं (Congress) धूळ चारली आहे. (Tripura Bypoll Result Latest Update)

काँग्रेसने राज्याची राजधानी असलेल्या आगरतळावर कब्जा केला आहे. ही प्रतिष्ठेची जागा मानली जाते. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार सुदीप रॉय बर्मन यांनी 3 हजार 163 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार अशोक सिन्हा यांचा पराभव केला.

Congress Latest News, BJP Latest Marathi News, Tripura Bypoll Result
भाजपची जोरदार मुसंडी; आझम खान यांच्या रामपूरवर कब्जा, आझमगडमध्येही आघाडी

बर्मन हे माजी मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. पण त्यांनी मंत्रिपदासह आमदारकीचा राजीनामा देत भाजपलाही सोडचिठ्ठी दिली. त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे या मतदारसंघात निवडणूक लागली होती. ते 2013 मध्ये काँग्रेसकडून तर 2018 मध्ये भाजपकडून या मतदारसंघातून निवडून आले होते. आगरतळा हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जातो.

निवडणुकीत नवनियुक्त मुख्यमंत्री माणिक साहा (Manik Saha) यांचाही विजय झाला आहे. मागील महिन्यात त्रिपुरामध्ये विप्लव देव यांच्याजागी साहा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्यात आली आहे. साहा हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी त्यांना या निवडणुकीत विजय मिळवणे आवश्यक होते.

Congress Latest News, BJP Latest Marathi News, Tripura Bypoll Result
सरनाईक, राठोड, भुसे, भूमरे यांच्यासह पंधरा बंडखोर आमदारांना मोदी सरकारकडून 'Y+' सुरक्षा

साहा यांची विधानसभेची पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत त्यांनी बोर्डोवली मतदारसंघातून 6 हजार 104 मतांनी विजय मिळवला आहे. तसेच भाजपच्या इतर दोन उमेदवारांना जुबराजनगर आणि सुरमा मतदारसंघात विजय मिळाला.

दरम्यान, देशातील तीन लोकसभा आणि सात विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा वरचष्मा राहिला आहे. त्रिपुरातील चार जागांसह भाजपने उत्तर प्रदेशातील आझम खान यांचा गड असलेल्या रामपूरमध्येही विजय मिळवला आहे. तर अखिलेश यादव यांच्या आझमगड मतदारसंघात आघाडी घेतली आहे. पंजाबमध्येही आपला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या लोकसभा मतदारसंघातही पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com