काँग्रेस सोडली अन् महिन्याच्या आतच लागली राज्यसभेची लॉटरी

तृणमूल काँग्रेसने सुश्मिता देव यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
trinamool congress nominates sushmita dev to rajya sabha
trinamool congress nominates sushmita dev to rajya sabha

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसने (TMC) सुश्मिता देव (Sushmita Dev) यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सुश्मिता देव यांनी महिला काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे काँग्रेस सोडल्यानंतर महिनाभरातच त्यांना राज्यसभेची (Rajya Sabha) लॉटरी लागली आहे. 

सुश्मिता देव यांनी 16 ऑगस्टला राजीनामा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींकडे पाठवला होता. आसाम विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसला देव यांच्या रूपाने आणखी एक मोठा धक्का बसला होता. देव यांनी तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि डेरेक ओब्रायन यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. सुश्मिता देव या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष मोहन देव यांच्या त्या कन्या आहेत. त्यांची आई बीथिका देव या आसाम येथील सिल्चर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. 

सुश्मिता देव यांना राज्यसभेवर पाठवण्याची घोषणा तृणमूल काँग्रेसने केली आहे. याबाबत  तृणमूलने म्हटले आहे की, सुश्मिता देव यांना राज्यसभेवर नामनिर्देशित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ममता बॅनर्जींची महिलांच्या सक्षमीकरणाची दूरदृष्टी असून, राजकारणात महिलांना अधिकाधिक सहभागी करुन समाजाला पुढे न्यायचे आहे. 

यावर प्रतिक्रिया देताना सुश्मिता देव म्हणाल्या की, मी अतिशय भारावून गेले आहे. मी मनापासून आमच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचे आभार मानते. संसदेत जास्तीतजास्त महिला दिसाव्यात हा ममतांचा निर्धार वाखाणण्यासारखा आहे. याचबरोबर ईशान्येतील व्यक्तीला अशी संधी देणे हे अतिशय वेगळे आहे. मी अतिशय चांगल्या प्रकारे काम करेन.   

देव यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. देव यांनी पक्ष सोडण्याबद्दल सिब्बल यांनी नेतृत्वाला जबाबदार धरले होते. सिब्बल यांनी म्हटले होते की, सुश्मिता देव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे तरुण नेते बाहेर पडत असताना आमच्यासारख्या वृद्धांकडून पक्ष बळकटीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना दोष दिला जात आहे. पक्ष अजूनही डोळे बंद ठेवूनच पुढे जात आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com