CBI : ममतांना आणखी मोठा धक्का ; तृणमूल काँग्रेस नेते अनुब्रत मंडलांना अटक

anubrata mondal : सीबीआयने गोवंश तस्करीप्रकरणी ही कारवाई केली आहे. अनुब्रत मंडल यांना सीबीआयने दोन दिवसांपूर्वीच समन्स पाठवले होते
anubrata mondal
anubrata mondalsarkarnama

नवी दिल्ली : गोवंश तस्करीप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते अनुब्रत मंडल (anubrata mondal) यांना सीबीआयकडून (cbi)अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.

सीबीआयने गोवंश तस्करीप्रकरणी ही कारवाई केली आहे. अनुब्रत मंडल यांना सीबीआयने दोन दिवसांपूर्वीच समन्स पाठवले होते. (trinamool congress leader anubrata mondal arrested by cbi)

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चॅटर्जी यांना अटक झालेली असतानाच आणखी एका नेत्यावर कारवाई झाल्याने ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे. अनुब्रत मंडल हे ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी आणि पक्षाचे बिरभूम जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत.

२०२० मध्ये गोवंश तस्करीप्रकरणी सीबीआयने त्यांना अटक केली आहे. २०१५-१७ दरम्यान सीमा सुरक्षा दलाने सीमेपार तस्करी होणाऱ्या २० हजार जनावारांना पकडलं होतं. याचप्रकरणी सीबीआयने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही ठिकाणांवर छापे टाकले होते.

anubrata mondal
शिंदे सरकारचं पहिलं पावसाळी अधिवेशन बुधवारपासून ; विरोधक-सत्ताधारी येणार आमनेसामने

सीबीआयचे अधिकारी आज सकाळीअनुब्रत मंडल यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत ३० गाड्यांचा ताफा होता. सीबीआयने त्यांच्या बंद खोलीत जवळपास दीड तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अनुब्रत मंडल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

सीबीआयने अनुब्रत मंडल यांना चौकशीसाठी यापूर्वी दहा वेळा समन्स पाठवले होते. परंतु ते कुठल्याही चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीत. त्यानंतर सीबीआयने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सीबीआयला अटकेची परवानगी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com