अमरनाथ यात्रेपुर्वी टीआरएफ'चे धमकीचे पत्र; केंद्र सरकार, आरएसएस निशाण्यावर

Amarnath Yatra 2022| पुढच्या महिन्यात 30 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होत असून 11 ऑगस्टला संपणार आहे.
Amarnath Yatra 2022
Amarnath Yatra 2022

Amarnath Yatra 2022 treat lettter news

नवी दिल्ली : पुढच्या महिन्यात 30 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होत आहे. मात्र, ही यात्रा सुरु होण्यापूर्वीच द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या दहशतवादी संघटनेने पत्राद्वारे धमकी दिली आहे. या पत्रातून TRF ने केंद्र सरकार (Central Government) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही (RSS) टीका केली आहे.

टीआरएफने पत्रात लिहीलं आहे की. ते अमरनाथ यात्रेच्या विरोधात नाहीत, मात्र अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने केंद्र सरकार आणि आरएसएस आपले घाणेरडे राजकारण करणार असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. अमरनाथ यात्रेसाठी पंधरा हजार ते 8 लाख यात्रेकरूंची नोंदणी करण्यात येत आहे. पण या यात्रेच्यामाध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्वयंसेवकांना काश्मीरमधील परिस्थिती चिघळवण्यासाठी पाठणार असल्याचा दावा या टीआरएफने केला आहे.

Amarnath Yatra 2022
ज्ञानव्यापीचं लोण पुण्यातही? त्या मंदिरांच्या जागी आता मशिदी; मनसेचा दावा

अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होत असून 11 ऑगस्टला संपणार आहे. ४३ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंची संख्या पूर्वीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. या वेळी रामबन आणि चंदनवाडीत यात्रेकरुंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

यात्रेकरूंसाठी बार-कोड प्रणाली आणि सॅटेलाइट ट्रॅकर्ससह RFID टॅगचा वापर केला जाणार आहे. प्रवासाचे मार्ग आणि त्यांच्या निवास्थानाच्या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय काश्मीरमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था राखण्यासाठी CRPF च्या 50 अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

अमरनाथ यात्रा नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

अमरनाथ यात्रा अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांच्या निशाण्यार राहिली आहे. 2000 मध्ये पहलगाम बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 यात्रेकरूंसह 25 लोक मारले गेले होते. त्याच वेळी, जुलै 2017 मध्ये प्रवासी बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. अमरनाथ यात्रा शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी गृह मंत्रालयाने विशेष तयारी केली आहे. यामध्ये सखोल सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवादी कारवाया घडू नये यासाठी ठोस व्यवस्था करण्यात येत आहे. ह्यात..

1- सुरक्षा दलाकडून ड्रोनविरोधी यंत्रणा बसवण्याची तयारी सुरू आहे.

२- प्रवासात वापरण्यात येणारे प्रवासी आणि सुरक्षा दलांच्या वाहनांवर RFID टॅग लावले जातील.

3- भाविकांना विशेष प्रकारचा बार कोड दिला जाईल.

4- बार कोडमुळे त्यांच्या निश्चित स्थानाची माहिती मिळेल.

5- अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सर्व निमलष्करी दले तैनात करण्यात येणार आहेत. सुरक्षा दलांना पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

6- स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम (SOP) आणखी मजबूत केली जात आहे.

7- प्रवासादरम्यान ताफ्यात कमी प्रमाणात वाहने असतील.

8- यावर्षी बुलेट प्रूफ आणि एमपीव्ही वाहनांची संख्या अधिक असणार आहे.

9- पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवर आरओपी आणि अँटी सबोटेज टीमची संख्या मजबूत असेल.

10- प्रवासाच्या मार्गावर IED चा धोका लक्षात घेता BDT टीमची संख्या वाढण्यात येणार आहे.

11- यासोबतच बीडीटीशी संबंधित 2 डझन नवीन तज्ञ कार्यरत आहेत ज्यांनी अलीकडेच आयईडी हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले आहे. यात्रा मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन बसवण्यात येणार आहेत.

12- सीआरपीएफच्या बुलेट प्रूफ अँटीमाइन वाहनांची संख्या यावर्षी प्रवासाच्या मार्गावर वाढवण्यात येणार आहे. यात्रा मार्गावरील अतिउंचीच्या भागात स्नायपर तैनात करण्यात येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com