Shatrughan Sinha : मोदी PM होऊ शकतात तर तेजस्वी यादव का नाही ? TMC खासदाराचा सवाल

TMC MP Shatrughan Sinha : पंतप्रधानपदाच उमेदवार कोण असेल, ममता बनर्जी की राहुल गांधी
TMC MP Shatrughan Sinha NEW
TMC MP Shatrughan Sinha NEW Sarkarnama

TMC MP Shatrughan Sinha : तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुद्ध सिन्हा यांनी पुन्हा एकदा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. बिहार येथे विरोधीपक्षांच्या संयुक्त बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेले खासदार शत्रुद्ध सिन्हा (TMC MP Shatrughan Sinha) माध्यमांशी बोलत होते.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री होतील की नाही, यावर विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी खोचक उत्तर दिले. त्यांची चर्चा समाज माध्यमावर सुरु आहे. आगामी २०२४च्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधानपदाच उमेदवार कोण असेल, ममता बनर्जी की राहुल गांधी यावर त्यांनी भाष्य केलं.

तेजस्वी यादव हे बिहारचे मुख्यमंत्री होऊ शकतात का ? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "जर मोदी हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, तर तेजस्वी यादव हे नाव तु्म्हाला का चालणार नाही ? तेजस्वी यादव हे चांगले काम करीत आहेत. लालू प्रसाद यादव यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला असून ते अनुभवी नेता आहेत,"

शत्रुद्ध सिन्हा म्हणाले, "मुख्यमंत्री बनण्यासाठी सनदी अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. तुमच्याकडे समर्थन आणि संख्या असेल तर तुम्हीही मुख्यमंत्री होऊ शकतात. मोदी हे पंतप्रधान होऊ शकतात, तर तेजस्वी यादव का होऊ शकणार नाही, "

TMC MP Shatrughan Sinha NEW
Pune : कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीत आज शेवटच्या दिवशी 'या' तोफा धडाडणार

मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे कौतुक करताना ते म्हणाले की नीतीश कुमार हे उत्तम काम करीत आहेत. पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून त्यांनी माघार घेतली आहे.आगामी निवडणुकात पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असणार याविषयी चर्चा सुरु आहेत.

शत्रुद्ध सिन्हा यांनी काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो यात्रे'चे कौतुक केलं. पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्या नावाकडे आपण दुर्लक्ष करुन चालणार नाबी, असेही ते म्हणाले.

'कोण पंतप्रधान होणार यापेक्षा कुणाला पुन्हा पंतप्रधानपदापासून लांब ठेवता येईल, याचा विचार करावा,'असे सिन्हा यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षाचे नेतृत्व राहुल गांधी हे करु शकतील, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com