कोरोनापेक्षा तर भाजपच खतरनाक...नुसरत जहाँ अन् अमित मालवीय आमनेसामने

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. राजकीय प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे.
tmc mp nusrat jahan says bjp is more dangerous than corona
tmc mp nusrat jahan says bjp is more dangerous than corona

कोलकता : काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीआधी पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उठली आहे. `आपले डोळे आणि कान उघडे ठेवा. कारण आपल्या आजुबाजूला काही लोक आहेत, जे कोरोनापेक्षाही जास्त खतरनाक आहेत. ते भाजपवाले आहेत,` असे म्हणत तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी थेट भाजपवरच शरसंधान साधले आहे. त्यावर भाजपनेही पलटवार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या वादात ओढत त्या तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याची टीका केली आहे. 

भाजपने पश्चिम बंगाल राज्य तृणमुलकडून आपल्याकडे खेचण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.  तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांनी बशीरघाट या त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील रक्तदान शिबिरावेळी भाजपवर टीका करण्याची संधी साधली. 

आपले डोळे व कान उघडे ठेवा. कारण आपल्या आजुबाजूला काही लोक असे आहेत जे कोरोनापेक्षा जास्त खतरनाक आहेत. कोरोनापेक्षा जास्त खतरनाक काय आहे, हे तुम्हाला माहित आहे का? ते भाजप आहे. कारण त्यांना आमच्या संस्कृतीविषयी माहिती नाही. त्यांना मानवता समजत नाही. कष्टाला ते किंमत देत नाहीत. त्यांना केवळ व्यापार करणे माहित आहे. त्यांच्याकडे खुप संपत्ती असून सगळीकडे पैशांची उधळण सुरू आहे. धर्माच्या आधारावर लोकांना एकमेकांविरोधात भडकवत आहेत, अशी टीका जहाँ यांनी केली आहे. 

या टीकेचा भाजपकडूनही समाचार घेण्यात आला आहे. भाजपाच्या सोशल मिडिया टीमचे प्रमुख अमित मालवीय यांनी टिवटरवरून थेट ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीवरून घाणेरेडे राजकारण केले जात आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील मंत्री सिद्दीकिला चौधरी यांनी लस घेऊन जाणारा ट्रक अडविला. आता मुस्लिमबहुल असलेल्या देगांगा भागात प्रचारादरम्यान तृणमूल खासदार भाजपची तुलना कोरोनाशी करत आहेत. पण त्यावर ममता यांची चुप्पी का आहे? तुष्टीकरण? असे प्रश्न उपस्थित करत मालवीय यांनी टीकास्त्र सोडले.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com