भाजपचा पराभव होताच पक्ष सोडलेल्या नेत्यानं लगावली नेतृत्वाला सणसणीत चपराक

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे.
भाजपचा पराभव होताच पक्ष सोडलेल्या नेत्यानं लगावली नेतृत्वाला सणसणीत चपराक
Babul SupriyoSarkarnama

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. तृणमूल काँग्रेसकडून (TMC) असनसोल लोकसभा मतदारसंघात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि बालीगंज विधानसभा मतदारसंघात बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी विजय मिळवला आहे. मागील वर्षी भाजपला (BJP) धक्का देत सुप्रियो यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. आजच्या भाजपच्या पराभवानंतर त्यांनी भाजप नेतृत्वाला सणसणीत चपराक लगावली आहे.

बालीगंज पोटनिवडणुकीत सुप्रियो यांना 20 हजार 228 मतांनी विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार आहे. भाजप तिसऱ्या स्थानी तर काँग्रेसच्या चौथ्या स्थानी आहे. केंद्रीय मंत्रिपद, खासदारकी आणि आता आमदारकी असा उलटा प्रवास सुप्रियो यांच्या निमित्ताने बंगालच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. आता पोटनिवडणुकीतील विजयानंतर सुप्रियो यांनी थेट भाजपच्या नेतृत्वावर निशाणा साधला आहे. सुप्रियो यांनी म्हटले आहे की, मत्सरी भाजप नेत्यांचे चेहरे पाहण्याची माझी इच्छा आहे. माझ्या चांगल्या कामाचे कधीही त्यांनी कौतुक केले नाही. उलट मलाच ते कमी लेखत. असनसोलमध्ये काडीपेटीतील काडी उभी केली तरी भाजपकडून निवडून येईल, अशी शेखी ते मिरवत. आता असनसोलमधील जनतेने त्यांना सणसणीत चपराक दिली असून, याबद्दल त्यांचा मी आभारी आहे.

Babul Supriyo
भाजपला मोठा धक्का! पाच पोटनिवडणुकांत मिळाला भोपळा

बंगालमधील एक लोकसभा व एका विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांचा आज निकाल लागत आहे. गायक व माजी खासदार बाबूल सुप्रियो यांच्या राजीनाम्यामुळे असनसोल मतदारसंघाची निवडणूक होत आहे. सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला होता. ते 2014 व 2019 अशा दोन्ही निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. आता त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं. बालीगंज विधानसभा मतदारसंघातून ते तृणमूलकडून मैदानात उतरले होते.

Babul Supriyo
उत्तरनंतर आणखी एका मतदारसंघात काँग्रेसच्या महिला उमेदवाराचा भाजपला दे धक्का!

असनसोल लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांचा पराभव केला. त्यांनी तब्बल तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. या विजयाबद्दल तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.