शत्रुघ्न सिन्हांची विक्रमी घोडदौड! भाजपच्या उमेदवारावर पावणेदोन लाख मतांची आघाडी

लोकसभेच्या पोटनिवडणुकीत अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी विक्रमी आघाडी घेतली आहे.
Shatrughan Sinha and Agnimitra Paul
Shatrughan Sinha and Agnimitra PaulSarkarnama

कोलकता : असनसोल लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (Loksabha Election) तृणमूल काँग्रेसचे (TMC) उमेदवार अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची विक्रमी घोडदौड सुरू आहे. त्यांनी भाजपच्या (BJP) उमेदवार अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांच्यावर तब्बल पावणेदोन लाखांनी आघाडी घेतली आहे. याचवेळी तृणमूल नेते बाबुल सुप्रियो यांनी बालीगंज विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवारावर आघाडी घेतली आहे.

असनसोल हे पश्चिम बंगालमधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. ही लोकसभेची जागा आतापर्यंत कधीच तृणमूलला जिंकता आलेली नाही. आता पहिल्यांदाच ही जागा तृणमूलच्या पारड्यात पडण्याचे चित्र आहे. शत्रुघ्न सिन्हा यांना तृणमूलने मैदानात उतरवल्यानंतर ते बाहेरचे आहेत, अशा शिक्का भाजपने मारला होता. त्यांच्या विरोधात बॉलीवूडमधील अग्निमित्रा पॉल यांनी भाजपने उतरवले होते. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत शत्रुघ्न सिन्हा 3 लाख 75 हजार 26 मते मिळाली असून, तर पॉल यांना 1 लाख 18 हजार 601 मते मिळाली आहेत.

Shatrughan Sinha and Agnimitra Paul
उत्तरमध्ये जाधवांची विजयाकडे वाटचाल! जयश्रीताईंनी विजयाचं श्रेय दिलं तीन नेत्यांना...

बंगालमधील एक लोकसभा व चार विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांचा आज निकाल लागत आहे. गायक व माजी खासदार बाबूल सुप्रियो (Babul Supriyo) यांच्या राजीनाम्यामुळे असनसोल मतदारसंघाची निवडणूक होत आहे. सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर खासदारकीचा राजीनामा दिला होता. ते 2014 व 2019 अशा दोन्ही निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. आता त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. बालीगंज विधानसभा मतदारसंघातून ते तृणमूलकडून मैदानात उतरले आहेत.

Shatrughan Sinha and Agnimitra Paul
पवार अन् राष्ट्रवादीला मी कायम विरोध केला पण त्यांनीच मंत्री केलं! गुलाबराव पाटलांची कबुली

अग्निमित्रा पॉल या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी बॉलीवूडमधील अनेक चित्रपट आणि कलाकारांसाठी फॅशन डिझायनिंग केलं आहे. त्यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर वर्षभरातच म्हणजे 2020 मध्ये पक्षाने त्यांच्या भाजप महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्षाची जबाबदारी टाकली. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना असनसोल दक्षिण मतदारसंघातून मैदानात उतरवले होते. त्यांनी तृणमूलच्या सयानी घोष यांचा पराभव केला होता. आता भाजपने त्यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. बॉलीवूडचा भाग असलेल्या अग्निमित्रा यांचा आता शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी सामना होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com