तिरूपती ट्रस्टची माघार : छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या गाड्यांना प्रवेश

Chhtrapati Shivaji Maharaj | Tirumala Tirupati Devasthanams : छत्रपती शिवाजी महाराजांची, गणपती, हनुमान यांच्या छोट्या मुर्त्यांवर बंदी नाही
Chhtrapati Shivaji Maharaj | Tirumala Tirupati Devasthanams
Chhtrapati Shivaji Maharaj | Tirumala Tirupati DevasthanamsSarkarnama

अमरावती : आंध्रप्रदेशमधील प्रसिद्ध तिरूमला तिरूपती बालाजी (Tirumala Tirupati Devasthanams) मंदिरात प्रवेश करताना यापुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असल्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती परभणीचे शिवसेना खासदार संजय (बंडू) जाधव यांनी दिली. खासदार जाधव ३ दिवसांपासून बालाजी मंदिरात असून तिथल्या प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आणि मंदिर प्रशासनाने एकत्रित पत्रकार परिषद घेवून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतरही देवतांच्या लहान मूर्ती गाडीत असल्यास मंदिरात प्रवेश करताना कोणतीही अडचण येणार नाही याबाबत माहिती दिली.

खासदार जाधव म्हणाले, मी मागील ३ दिवसांपासून तिरुमला तिरुपती मंदिरात आहे. श्री. व्यास महाराज यांचे कथा/किर्तन ऐकण्यासाठी आलो होतो. अत्यंत चांगला कार्यक्रम झाला. मंदिर प्रशासनाने खूप सहकार्य केले. मंदिराचे मुख्य विश्वस्त ए.व्ही.धर्मा रेड्डी हे देखील उपस्थित होते.

Chhtrapati Shivaji Maharaj | Tirumala Tirupati Devasthanams
महाडिकांचा दुसरा घाव 'गोकूळ'वर; पाटलांकडून एक-एक किल्ला पुन्हा ताब्यात घेण्याचा चंग

चार दिवसांपूर्वी मी एक फेसबूक पोस्ट बघितली. त्याबाबत देखील मी रेड्डी यांच्याशी चर्चा केली. मात्र अशी कोणतीही अडवणुकीची कृती मंदिर प्रशासनाकडून झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इथल्या नियमानुसार मंदिराच्या आवारत कोणत्याही राजकीय, सामाजिक पक्षाचा झेंडा, निशाणी, चिन्ह यावर बंदी आहे. मात्र भाविकांकडून गाड्यांत लावण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, गणपती, हनुमान यांच्या छोट्या मुर्त्यांवर बंदी नाही. त्यामुळे या छोट्या मुर्त्यां गाडीत असल्यास यापुढे देखील मंदिर प्रशासनाकडून कोणतीही अडवणूक होणार नाही, असे खासदार जाधव यांनी स्पष्ट केले.

Chhtrapati Shivaji Maharaj | Tirumala Tirupati Devasthanams
पुण्यात येण्याआधीच मुख्यमंत्र्यांवर नामुष्की; 'एकनाथ शिंदे' उद्यानाचा उद्घाटन सोहळा रद्द

२४ जुलै रोजी तिरूमला तिरूपती बालाजी मंदिरात केवळ गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांची मूर्ती असल्याने प्रवेश नाकारला असल्याचा धक्कादायक दावा महाराष्ट्रातील एका भाविकाने केला होता. ज्या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असेल अशा गाड्यांना तिरूमला तिरूपती देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांकडून अडवण्यात येत असल्याचा दावा या भाविकाने केला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com