गाडीत 'शिवाजी महाराज' असल्याने बालाजीला प्रवेश नाकारला? मिलिंद नार्वेकर मंदिराचे विश्वस्त

Shivsena | Milind Narvekar | Tirumala Tirupati Devsthan | या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Milind Narvekar | Tirumala Tirupati Devsthan
Milind Narvekar | Tirumala Tirupati DevsthanSarkarnama

अमरावती : आंध्रप्रदेशमधील प्रसिद्ध तिरूमला तिरूपती बालाजी मंदिरात केवळ गाडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांची मूर्ती असल्याने प्रवेश नाकारला असल्याचा धक्कादायक दावा महाराष्ट्रातील एका भाविकाने केला आहे. ज्या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती असेल अशा गाड्यांना तिरूमला तिरूपती देवस्थानाच्या कर्मचाऱ्यांकडून अडवण्यात येत असल्याचा दावा या भाविकाने केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. (Tirumala Tirupati Devsthan | Maharashtra | Latest News)

या व्हिडीओमध्ये संबंधित भाविकाने दावा केला की, तिरूमला तिरूपती मंदिराच्या चेक पोस्टवर वाहने अडवण्यात येत असून केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती गाडीमध्ये असल्यानेच मला प्रवेश नाकारण्यात आला आहे. पुढे जायचे असल्यास संबंधित मूर्ती काढून टाका अन्यथा पुढे जाऊ दिले जाणार नाही असे तिरुमला तिरुपती देवस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र आपण मूर्ती काढून टाकण्यास नकार दिला असून आपण मंदिरात न जाता मागे येवू पण मूर्ती काढणार नसल्याचेही या भाविकाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या घटनेसंबंधी देवस्थान प्रशासनाने स्पष्टीकरण दिले असून गाडीमध्ये मूर्ती, फोटो अथवा इतर कोणतीही राजकीय निशाणी अशा वाहनांवर एका दशकापूर्वी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळेच संबंधित भाविकाला प्रवेश नाकारला असावा. मात्र अडवलेल्या गाडीतील मूर्ती शिवाजी महाराजांची असल्याचे समजताच त्यांना प्रवेश देण्यात आला. देवतांच्या चित्रांशिवाय कुठलाच फोटो ठेवण्यास मनाई केली आहे पण सदर भाविकाने केलेले आरोप खोटे असल्याचेही स्पष्टीकरण बालाजी देवस्थानने दिले आहे.

या घटनेनंतर अनेकांकडून मंदिर प्रशानसावर आक्षेप घेतले जात असून देवस्थानाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्त्यांवर बंदी घातली तर आम्ही महाराष्ट्रीतल लोकं तिथे येणार नाहीत अशा शब्दांत रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या विश्वस्तपदावर असलेल्या एकूण २९ जणांपैकी एक विश्वस्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता या प्रकरणाबाबत ते नेमकं काय स्पष्टीकरण देणार याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com