शशिकलांची सुटका अन् मुख्यमंत्र्यांनी मारले एकाच दगडात दोन पक्षी!

शशिकला यांची तब्बल चार वर्षांनंतर कारागृहातून सुटका झाली आहे. त्यांची सुटका झाल्याने तमिळनाडूतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
at the time of sasikala release palaniswami inaugurates jayalalita memorial
at the time of sasikala release palaniswami inaugurates jayalalita memorial

चेन्नई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला यांची आज तब्बल चार वर्षांनतर कारागृहात सुटका झाली आहे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बंगळूरमधील रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. दरम्यान, आजच मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांनी जयललितांच्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन करुन एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. 

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात होत्या. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आज त्यांची सुटका झाली. त्यांची प्रकृती २० जानेवारीला अचानक बिघडल्याने त्यांना बंगळूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. 

दरम्यान, आजच मुख्यमंत्री ए़डापड्डी पलानीस्वामी यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांनी जयललितांच्या भव्य स्मारकाचे उद्धाटन आज केले. मरीना बीचवर हा कार्यक्रम झाला. हे स्मारक फिनिक्सच्या आकाराचे असून, त्यासाठी ८० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शशिकलांची सुटका झाली त्याच दिवशी मुद्दामहून हा कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. त्यांनी पक्षातील एकीचे प्रदर्शन केले आणि जयललितांच्या भव्य स्मारकाचे उद्घाटन करुन त्यांचे खरे वारसदार आपणच असल्याचे जनतेच्या मनावर बिंबवले. 

शशिकलांच्या सुटका होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे. आजचा कार्यक्रम हा त्याचाच भाग होता. कार्यकर्त्यांना पक्ष एकसंध असल्याचे दाखवून देण्याचा यामागे हेतू होता. 

कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी जाण्याआधी शशिकलांनी विश्वासू सहकारी असलेले पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदी बसवले होते. नंतर तेच शशिकलांच्या विरोधात गेले. आता त्यांनी थेट शशिकलांना आव्हान दिले आहे. नुकतेच पलानीस्वामी म्हणाले होते की, शशिकलांना आम्ही अण्णाद्रमुध्ये प्रवेश देणार नाही. शशिकला म्हणजे काय पक्ष आहेत का? त्यांच्या सुटकेने काहीही फरक पडणार नाही. शशिकलांचे भाचे टी.टी.व्ही. दिनकरन यांच्या पक्षातील बहुतांश नेते आता अण्णाद्रमुकमध्ये परतले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com