आता वेळ आलीय! विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनियांचा निर्वाणीचा इशारा

बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह 19 पक्षांचे नेते उपस्थित होते.
Time Has Come To Rise Above Compulsions says Sonia Gandhi
Time Has Come To Rise Above Compulsions says Sonia Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी देशभरातील 19 पक्षांच्या नेत्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्वाणीचा इशारा दिला आहे. आता 2024 च्या लोकसभा निवडणुका हे अंतिम ध्येय ठेवत त्यासाठी सुनियोजितपणे एकत्रित येण्याची गरज आहे. आता दुसरा पर्याच नाही. सर्व हेवेदावे बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे, असं आवाहन करत सोनियांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. (Time Has Come To Rise Above Compulsions says Sonia Gandhi)

सोनिया गांधी यांनी शुक्रवारी देशभरातील 19 राजकीय पक्षांच्या नेत्यांशी व्हर्चुअल संवाद साधला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सोनियांनीच ही बैठक बोलावली होती. त्यानुसार त्यांनी निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र येण्याचं आवाहनही केलं आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून यावर कोणती रणनीती ठरवली जाणार, सर्व पक्ष एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 

सोनिया गांधी म्हणाल्या, हे आपल्यासमोर आव्हान आहे. आपण एकत्र आल्यास हे करू शकतो, त्यासाठी एक व्हावंच लागेल. एकत्रित काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. स्वातंत्र्य चळवळीची मूल्य आणि संविधानातील मुलभूत तत्वांवर विश्वास असलेलं सरकार देशाला देण्याचे एकमेव उद्दिष्ट निश्चित करून सुरूवात करायला हवी. भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असताना हीच ती योग्य वेळ आहे. 

या बैठकीमध्ये सोनिया गांधी यांनी संसदेत विरोधकांनी दाखविलेल्या एकीचाही उल्लेख केला. त्या म्हणाल्या, संसदेमध्ये सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकाच उद्देशाने जवळपास 20 दिवस एकत्रित काम केलं. पुढील संसदीय अधिवेशनातही ही एकी कायम राहील, असा मला विश्वास आहे. पण यापेक्षा मोठी लढाई संसदेबाहेर लढायची आहे, असं म्हणत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन सर्व पक्षांना केले.

दरम्यान, या व्हर्चुअल बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह डीएमके, जेएमएम, सीबीआय, सीपीएम, एनसी, आरजेडी, एआययूडीएफ, व्हीसीके, लोकतांत्रिक जनता दल, जेडीएस, आरएलडी, आरएसपी, केरळा काँग्रेस मनी, पीडीपी, आययूएमएल या पक्षांचेही नेतही उपस्थित होते. तर आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष व बहूजन समाज पक्षाच्या नेते अनुपस्थित राहिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com