सरकारचे धाबे दणाणले : तब्बल 3 हजार कोरोना पॉझिटिव्ह नागरिक गायब

देशातील कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कर्नाटकातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना आता कोरोना रुग्ण गायब होऊ लागले आहेत.
three thousand covid positive patients are missing from bengaluru
three thousand covid positive patients are missing from bengaluru

बंगळूर : कर्नाटकात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी राज्यात लॉकडाउन लावला आहे. असे असताना बंगळूरमध्ये तब्बल 2 ते 3 हजार कोरोना पॉझिटिव्ह आलेले नागरिक गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॉझिटिव्ह आल्यानंतर हे नागरिक मोबाईल बंद करुन आणि घराला कुलूप लावून बेपत्ता झाले आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळूरमधून सुमारे 2 ते 3 हजार कोरोना रुग्ण गायब झाले आहेत. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर हे रुग्ण मोबाईल बंद करुन आणि घराला कुलूप लावून गायब झाले आहेत. त्यांच्यामुळे इतर नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच, या गायब झालेल्या रुग्णांना काही त्रास झाला तर ऐनवेळी त्यांना रुग्णालय शोधण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. यामुळे सरकारी यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. या गायब रुग्णांचा शोध पोलीस घेत आहेत. 

देशात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या पहिल्या दहा राज्यांमध्ये कर्नाटकचा समावेश आहे. देशातील दहा राज्यांमध्ये एकूण रुग्णांपैकी 72.20 टक्के रुग्ण आहेत. मागील 24 तासांत कर्नाटकात 39 हजार 47 कोरोना रुग्ण सापडले आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 28 हजार 903 आहे. मागील  24 तासांत राज्यात 229 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

देशात दर तासाला कोरोनामुळे 145 जणांचा मृत्यू 
देशात आता दरतासाला सुमारे 145 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 87 लाख 62 हजार 976 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 8 हजार 330 झाली आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 3 लाख 86 हजार 452 रुग्ण सापडले असून, 3 हजार 498 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

मागील 24 तासांत देशात 3 हजार 498 मृत्यू झाले आहेत. यात महाराष्ट्र 771, दिल्ली 395, उत्तर प्रदेश 295, कर्नाटक 270, छत्तीसगड 251, गुजरात 180, राजस्थान 158, झारखंड 145, पंजाब 137 आणि तमिळनाडूतील 107 मृत्यूंचा समावेश आहे.  

कोरोनाचे राज्यनिहाय बळी (एकूण 2 लाख 8 हजार 330) 
महाराष्ट्र : 67,985
दिल्ली : 15,772  
कर्नाटक : 15,306 
तमिळनाडू : 13,933  
उत्तर प्रदेश : 12,238  
पश्चिम बंगाल : 11,248  
पंजाब : 8,909 
छत्तीसगड : 8,132 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com