Election Commission News: निवडणूक आयोगाची 'ही' मोठी घोषणा; स्थलांतरीत विद्यार्थी आणि नोकरदारांना लाभ होणार

Election Commission : निवडणूक आयोग लवकरच राजकीय पक्षाची बैठक घेणार
Election Commission Latest News
Election Commission Latest NewsSarkarnama

Election Commission News: निवडणूक आयोगाने एक महत्वपूर्ण आणि मोठा महत्वपूर्ण घोषणा केली आहे. आयोगानं येत्या 16 जानेवारी रोजी सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राजकीय पक्षांना बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. या बैठकीत स्थलांतरीत मतदारांना मतदानाचा हक्क देण्यासंबंधी महत्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे. विद्यार्थी आणि स्थलांतरीत कामगारांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे. यासाठी निवडणूक आयोग लवकरच राजकीय पक्षाची बैठक घेणार आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission of India) स्थलांतरीत मतदारांना मतदानाचा हक्क देण्यासाठी राजकीय पक्षांना त्यांची मत 31 जानेवारीपर्यंत लिखित स्वरुपात मांडण्यास सांगितलं आहे. यामध्ये स्थलांतरीत मतदारांना मतदानाचा हक्क देण्यासाठी कायद्यात कोणते बदल करणं आवश्यक आहे.? प्रशासकीय प्रक्रियेत कोणते बदल करणं गरजेचं आहे? मतदान पद्धत/RVM/तंत्रज्ञान यासह आवश्यक असल्यास इतर कोणते बदल करणं गरजेचं आहे? हे लिखित स्वरुपात द्यायचं आहे.

Election Commission Latest News
Uddhav Thackeray on Shinde: शिंदे यांच्यात हिमंत नाही, ते फक्त पक्ष, कार्यालय, नेते चोरतात..! ; ठाकरेंचा घणाघात

निवडणूक आयोगाने येत्या 16 जानेवारी रोजी देशातील 8 राष्ट्रीय व 57 प्रादेशिक पक्षांना राजकीय पक्षांना या नवीन निर्णयासंदर्भात प्रेझेंटेशन देण्यासाठी बोलावले आहे. यावेळी तांत्रिक तज्ज्ञ समितीचे सदस्यही उपस्थित राहणार आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय प्रथमदर्शी योग्य जरी वाटत असला तरी त्याची अंमलबजावणी करणं कठीण असल्याचं दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा गैरवापर होऊ नये म्हणून आयोग काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Election Commission Latest News
Nitesh Rane: '' जे जे बाळासाहेबांचं, ते ते शिंदेंचं; वाटीभर पक्षानं..''; नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचलं

स्थलांतरीत मतदारांसाठी दूरस्थ मतदानाची सोय...

निवडणूक आयोगाकडून स्थलांतरीत मतदारांसाठी दूरस्थ मतदानाची सोय करण्याच्या तयारीत आहे. याचा विद्यार्थी आणि स्थलांतरीत कामगारांना मोठा लाभ होणार आहे. यासाठी निवडणूक आयोग लवकरच राजकीय पक्षाची बैठक घेणार आहे. मात्र, हा निर्णय अंमलात आणताना कायदेशीर आणि प्रशासकीय आव्हान निवडणूक आयोगासमोर असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com