Karnataka Cabinet News : काँग्रेसने मंत्रिमंडळात असे साधले जातीय समीकरण; दक्षिण कर्नाटकला झुकते माप

Karnataka News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
Karnataka Cabinet Oath
Karnataka Cabinet OathSarkarnama

Karnataka Cabinet Oath Ceremony : काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटच्या मुख्यमंत्री पदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये काँग्रेसने जातीय समीकरणही राखले आहे.

बेंगळुरू येथील श्री कांतीराव स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा झाला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते या सोहळ्याला उपस्थित होते.

Karnataka Cabinet Oath
Karnataka CM oath Ceremony : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, डीके शिवकुमार यांच्यासह 'या' आठ आमदारांनी घेतली शपथ

दरम्यान, आज आठ मंत्र्यांनीही शपथ घेतली असून कर्नाटकचे नवे मंत्रिमंडळ आता सज्ज झाले. जी परमेश्वरा, के एच मुनियप्पा, के जे जॉर्ज, एम बी पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे, रामलिंगा रेड्डी व बी झेड जमीर अहमद खान यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी या मंत्र्यांना शपथ दिली आहे.

मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत काँग्रेसने दिलेले आश्वासन पाळण्यात येणार असल्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली. त्यामुळे आता मंत्रिमंडळ बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शपथविधीपूर्वी काँग्रेस (Congress) नेते सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांनी शुक्रवारी (१९ मे) दिल्लीला जाऊन मंत्रिमंडळाची स्थापना व खातेवाटपा संदर्भात चर्चा केली होती.

Karnataka Cabinet Oath
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराच्या हलचालींना वेग ? मंत्रीपदासाठी आमदारांची 'फिल्डिंग'

पहिल्या मंत्रिमंडळात उत्तर कर्नाटकाऐवजी दक्षिण कर्नाटककडे काँग्रेसने लक्ष दिले आहे. दक्षिण कर्नाटकातून 5 मंत्री आहेत, तर उत्तरेतून 3 मंत्री आहेत. 8 पैकी 3 मंत्री अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत. बाकी समाजातील आमदारांना देखील मंत्री करून पक्षाने सामाजिक संदेश दिला. मुख्यमंत्री कुरुबा आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे वोक्कलिगा आहेत.

याशिवाय, डॉ. जी परमेश्वरा, केएच मुनियप्पा, प्रियांक खरगे हे एससी प्रवर्गातील तर सतीश जारकीहोळी एसटीचे, एमबी पाटील लिंगायत समाजाचे आणि केजी जॉर्ज हे ख्रिश्चन तर जमीर अहमद खान मुस्लिम व रामलिंगा हे रेड्डी रेड्डी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसने सामाजिक समतोल राखला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com