गेहलोतांना मुख्यमंत्री पदाचा मोह सुटेना; काँग्रेसचे अध्यक्षपद गमावणार?

राजस्थानमध्ये (Rajasthan) राजकीय संकट निर्माण झाले आहे.
Ashok Gehlot
Ashok GehlotSarkarnama

Ashok Gehlot : नवी दिल्ली : राजस्थानमध्ये (Rajasthan) राजकीय संकट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या गटातील आमदारांनी पक्षाच्या बैठकीला हजेरी लावली नाही. त्यामुळे काँग्रेस (Congress) हायकमांड गेहलोत यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेहलोत पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात, असे वृत्त समोर येत आहे. केरळपासून जयपूरपर्यंत सर्व काँग्रेसच्या नेत्यांचा सूर एकच असल्याची माहिती मिळत आहे.

गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत', असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. इतर नेते 30 सप्टेंबरपूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणुकाचा अर्ज भरतील, असेही त्या नेत्यांनी म्हटले आहे. आता मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, केसी वेणुगोपाल हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत असतील, अशी माहिती मिळत आहे. सीडब्ल्यूसी सदस्य व पक्षाच्या एका नेत्याने असेही सांगितले की गेहलोत ज्या पद्धतीने वागले ते पक्ष नेतृत्वाला आवडेले नाही. राजस्थानच्या राजकीय पेचामुळे नेतृत्वाची अडचण झाली आहे.

Ashok Gehlot
लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं आणखी एक नवं अभियान

राजस्थानमधील घडामोडींनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे. या नेत्यांसोबत राजस्थानातील घडामोडींसह अध्यक्ष निवडीवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केके वेणुगोपाल 10 जनपथवर पोहोचले आहे. राजस्थानचे निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे हेही बैठकीला उपस्थित राहणार आहे. राजस्थान काँग्रेसचेही काही नेते 10 जनपथवर आले असल्याची माहिती मिळत आहे. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

काँग्रेस नेते के मुरलीधरन म्हणाले, की काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतचे चित्र 30 सप्टेंबरलाच स्पष्ट होईल. सर्व नेत्यांशी चर्चा सुरू आहे. कोणताही निष्कर्ष निघाला नसून तीन दिवसांत सर्व प्रकरणे निकाली काढली जातील, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गांधी परिवार हस्तक्षेप करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आधीच जाहीर केले आहे, की ते अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करणार नाही.

Ashok Gehlot
राजस्थानमध्ये राजकीय संकट; राहुल गांधींनी पाठवला महत्त्वाचा संदेश

राजस्थानमधील प्रकरण एक-दोन दिवसांत निकाली निघेल. खासदार शशी थरूर यांनी आधीच घोषणा केली होती. मात्र, तीन दिवसांत आणखी काही लोकही अर्ज दाखल करणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल, असेही मुरलीधरन यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in