भाजपचे बंडखोर मोदी-शहांना आणणार अडचणीत; दिली 'ही' धमकी

Gujarat Election : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
Gujarat Election News
Gujarat Election News Sarkarnama

Gujarat Election : गुजरात (Gujarat) विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) तिकीट नाकारल्यानंतर पक्षाच्या एका विद्यमान आमदारासह चार माजी आमदारांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची धमकी दिली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

पक्षातील काही नाराज नेत्यांनी त्यांच्या समर्थकांशी सल्लामसलत करून पुढचे पाऊल उचलणार असल्याचे सांगितले. मात्र, भाजपचे माजी आमदार हर्षद वसावा यांनी शुक्रवारी नांदोड (एसटी राखीव) जागेवरून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Gujarat Election News
शहाजीबापू पाटलांना घेरण्याची उद्धव ठाकरेंची रणनीती : कट्टर विरोधकास पाठबळ!

हर्षद वसावा हे गुजरात भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत. ते 2002 ते 2007 आणि 2007 ते 2012 या काळात त्यांनी पूर्वीच्या राजपिपला जागेचे प्रतिनिधित्व केले होते. नर्मदा जिल्ह्यातील नांदोड ही जागा सध्या काँग्रेसच्या (Congress) ताब्यात आहे. या जागेवरून भाजपने डॉ. दर्शन देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. या घोषणेने नाराज झालेल्या हर्षद वसावा यांनी भाजपमधील आपल्या पदाचा राजीनामा देत शुक्रवारी नांदोड जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वसावा पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, येथे खरा भाजप आणि खोटा भाजप आहे. वचनबद्ध कार्यकर्त्यांना बाजूला ठेऊन नवोदितांना महत्त्वाची पदे देणाऱ्यांचा आम्ही पर्दाफाश करू. मी माझा राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. 2002 ते 2012 या काळात मी आमदार म्हणून किती काम केले हे या भागातील लोकांना माहीत आहे. शेजारच्या वडोदरा जिल्ह्यात भाजपचे एक विद्यमान आमदार आणि दोन माजी आमदार तिकीट न दिल्याने पक्षावर नाराज आहेत.

वाघोडियाचे सहा वेळा आमदार राहिलेले मधु श्रीवास्तव यांनी तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांची इच्छा असल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले. या जागेवरून भाजपने अश्विन पटेल यांना उमेदवारी दिली आहे. वडोदरा जिल्ह्यातील पदरा मतदारसंघातील भाजपचे आणखी एक माजी आमदार दिनेश पटेल उर्फ ​​दिनू मामा यांनीही आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. या जागेवरून भाजपने चैतन्यसिंह जाला यांना तिकीट दिले आहे. ही जागा काँग्रेसच्या ताब्यात आहे.

कर्जनमध्ये भाजपचे माजी आमदार सतीश पटेल विद्यमान आमदार अक्षय पटेल यांना तिकीट देण्याच्या निर्णयावर नाराज आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी भाजपचे राज्य युनिट सरचिटणीस भार्गव भट्ट आणि गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी शनिवारी वडोदरा येथे जाऊन स्थानिक कार्यकर्त्यांची भेट घेतली. वडोदरातील सर्व जागा भाजप जिंकेल, असा विश्वास भट्ट यांनी व्यक्त केला.

Gujarat Election News
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या शेगावमधील सभेला पवार, ठाकरे उपस्थित राहणार..

दरम्यान, जुनागढच्या केशोद मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार अरविंद लडाणी यांनी शनिवारी विद्यमान आमदार देवभाई मालम यांना पक्षाने तिकीट दिल्यानंतर ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. भाजपने आतापर्यंत एकूण 182 विधानसभा मतदारसंघांपैकी 166 मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com