धक्कादायक! प्रियकराच्या साथीने पत्नीनेच केली भाजप नेत्याची हत्या

नोएडातील मिर्झापूरमध्ये ९ फेब्रुवारीला भाजप बुथ अध्यक्ष वीरपाल यांची हत्या करण्यात आली.
UP Police solved murder case
UP Police solved murder case

मिर्झापूर : उत्तरप्रदेशात (Uttar Pradesh) विधानसभा निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रचारसभांच्या तोफा धडाडताना दिसत आहेत. एकीकडे निवडणूकांची रणधुमाळी सुरु असताना राज्यात भाजप नेत्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या वातावरणाचा फायदा उचलण्याच्या हेतूने भाजप नेत्याच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे.

नोएडा पोलीस उपायुक्त (झोन III) अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडातील मिर्झापूरमध्ये ९ फेब्रुवारीला भाजप बुथ अध्यक्ष वीरपाल यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी तीन दिवसात या प्रकरणाचा छडा लावत या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. भाजप नेत्याच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी नेत्याच्या पत्नी आणि प्रियकरासह आणखी दोघांना अटक केली आहे. आरोपींनी मृताची ओळख मिटवण्यासाठी हत्येनंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला होता.

UP Police solved murder case
सोमय्यांचा सत्कार महागात; शहराध्यक्षांसह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वीरपाल यांच्या पत्नी नेहाचे गेल्या तीन वर्षांपासून मुकेश उर्फ ​​सोनूसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी मिळून वीरपालचा काटा काढायचा होता. याच दरम्यान नेहाला समजले की, वीरपालला यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून घेतलेल्या जमिनीच्या बदल्यात एक कोटी रुपये आणि प्लॉट मिळणार आहे. या पैशाच्या आणि जमिनीच्या लालसेपोटी वीरपालच्या हत्येचा कट रचला गेला.

वीरपालची हत्या करण्यासाठी नेहा आणि मुकेशने या कटात त्यांच्या दोन मित्रांनाही सहभागी करुन घेत ५० हजार रुपये दिले होते. ९ फेब्रुवारीच्या रात्री नेहा आणि मुकेशने वीरपालला मारण्यासाठी राजकुमार आणि भूदेव शर्मा यांना 50 हजार रुपये दिले. या चौघांनी वीरपालची गळा आवळून हत्या केली, त्यानंतर अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. मृतदेहावर रजाई टाकून आरोपी पळून गेले. वीरपाल आणि नेहा यांचे २००८ मध्ये लग्न झाले होते. त्यांना 13, 11 आणि 7 वर्षांची तीन मुले आहेत. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले. तेथून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com