मोदी सरकारचा तिसरा वर्धापनदिन होणार धुमधडाक्यात; 'हे' उपक्रम राबवणार

मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसाद्वारे प्रत्युत्तर म्हणून २६ मे रोजी देशभरात एकाच वेळी पाठ करण्याचीही योजना भाजपने आखली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या (Narendra Modi Government) एकूण ८ व्या व दुसऱ्या कार्यकाळातील तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात जोरदार कार्यक्रमांचा बार उडवून देण्याचे नियोजन सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने (BJP) केले आहे. किमान ११ ठळक उपक्रमांभोवती (नमो-एकादशसूत्री) व अन्य मुद्यांबाबत वर्धापनदिन सोहळ्याची आखणी करण्यात येणार आहे. वरिष्ठ पक्षनेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) व पक्षाध्यक्ष जे पी नड्डा (J.P Nadda) यांनी कार्यक्रमांच्या आखणीबाबत आज (ता. 26 एप्रिल) दिल्लीत दीर्घ चिंतन-मंथन केले.

PM Narendra Modi
पंतप्रधान मोदींच्या 'हुनर हाट'चा साडेनऊ लाख कारागीरांना झाला लाभ

३० मे २०१९ रोजी टीम मोदी - २ चा भव्य शपथविधी पार पडला होता. महामारीची कोरोना-काजळी क्षीण झाल्याने यंदाचा वर्धापनदिन सोहळा जंगी करण्यात कोणतीही कसर सोडायची नाही, असा भाजपचा निर्धार आहे. जम्मू-काश्मीरचे कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक प्रथेला फाटा, नागरिकत्व दुरूस्ती कायदा असे मोठे व दूरगामी निर्णय मोदी सरकारने दुसऱया कार्यकाळाच्या प्रारंभीच केले होते. त्याबाबत व मोफत रेशनसारख्या जनकल्याणाच्या योजनांबाबत जनतेत जाऊन माहिती देणे याची जबाबदारी खासदार ते नगरसेवक अशा साऱ्या पातळ्यांपर्यंत वाटून दिली जाणार आहे.

सध्याच्या संसदेच्या बरोबर समोर निर्माण होणाऱ्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन याच वर्षाअखेर (२०२२) करण्याचा विडा सत्तारूढ नेतृत्वाने उचचला. संसदेच्या नवीन इमारतीचे काम - मनोजवं मारूततुल्य वेगम् या गतीने सुरू आहे ते पाहता भाजपचा हा पण शब्दशः पूर्ण होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. संघपरिवाराच्या अजेंड्यावरील महत्वाकांक्षी समान नागरी संहितेचा कायदा मंजूर करून शक्यतो या नव्या संसदेचे उद्घाटन करण्याचेही मोदी-शहा यांचे मानस आहेत.

PM Narendra Modi
Ajit Pawar : कोरोनामध्ये धंदे बसले, नोकऱ्या गेल्या आणि यांना भोंगा आठवतोय...

मोदी सरकार २०१९ मध्ये सलग दुसऱ्या वेळेस केंद्रात घसघशीत बहुमताने सत्तेवर आले त्यानंतरच्या दोन्ही वर्धापनदिनांवेळी कोरोना महामारीचे सावट देशावर आले. त्यामुळे दोन्ही वर्षी भाजपने कोरोनाग्रस्तांची सेवा हीच थीम राबविली होती. महामारीचे संकट गेल्या काही महिन्यांपासून क्षीण होत चालले आहे. लसीकरणाचा आकडा पावणेदोनशे कोटींचा टप्पा ओलांडून गेल्याने नव्या व्हायरसची भितीही कमी होत चालली आहे. राजकीय आघाडीवर उत्तर प्रदेश पुन्हा भाजपकडे आल्यानेही पक्षकार्यकर्त्यांचा उत्साह दांडगा आहे. नड्डा यांनी वर्धापनदिन सोहळ्याच्या आखणीसाठी समिती नेमली तिची दिर्घ बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, राजीव चंद्रशेखर, राज्यसभेतील पक्षाचा आवाज असलेले खासदार डॅा. विनय सहस्त्रबुध्दे, सी.टी रवी, डी पुरंदरेश्वरी, अनिल बलुनी, राजदीप राय व अपराजिता सारंगी, शिव प्रकाश, अनुसूचित सेलचे अध्यक्ष लालसिंह आर्य हे या समितीत आहेत.

PM Narendra Modi
नवनीत राणा आरोप : ‘संजय पांडेंनी पुरावा देत फडणवीसांना उघडे पाडले’

५ मे च्या आसपास कार्यक्रम पत्रिका व जबाबदाऱयांचे वाटप अंतिम करण्याच्या सूचना या समितीला देण्यात आल्या आहेत. समितीच्या पहिल्या बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी नड्डा आज शहांच्या दरबारात पोहोचले. कार्यक्रमांची रूपरेषा-वरून मंजूर झाल्यावर व तेथून आलेल्या बदलांनुसार अंतिम कार्यक्रमाची घोषणा भाजप करेल.

देशभरात गुंजणार हनुमान चालीसा...

मशिदींवरील भोंग्यांना हनुमान चालिसाद्वारे प्रत्युत्तर ही संघपरिवाराची भूमिका व त्याअनुषंगाने तयार झालेले वातावरण पहाता या स्त्रोत्राचा २६ मे (गुरूवार) रोजी देशभरात एकाच वेळी पाठ करण्याचीही योजना भाजपने आखली आहे. याचा जागतिक पातळीवर विस्तार करण्याचीही पक्षाची अंतस्थ योजना आहे. २६ मे (२०१४) रोजी मोदींनी देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वप्रथम शपथग्रहण केले होते तो संदर्भ या तारखेला आहे. यानिमित्ताने पंतप्रधानांना दीर्घयू लाभो, असे साकडे भाजपच्या करोडो कार्यकर्त्यांतर्फे मारूतीरायास घालण्यात येईल. या उपक्रमासाठी मोदी सरकारच्या वर्धापनदिनासारखे उत्तम निमित्त दुसरे नसेल असाही मतप्रवाह कडव्या भाजप कार्यकर्त्यांत आहे. हा कार्यक्रम बूथ-बूथवर होणार की विभागात होणार हे अद्याप निश्चित नाही.

वर्धापनदिनाचे काही ठळक उपक्रम

  • स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,

  • पंतप्रधान ते प्रधानसेवक - एक प्रवास

  • स्वतंत्र भारताचे स्वतंत्र संसद भवन

  • विश्वसनीयतेपासून जबाबदारीपर्यंत

  • मोदीयुगात जगात भारताची उजळलेली प्रतिमा, आन-बान-शान

  • रशिया- युक्रेन युध्दात भारताची महत्वपूर्ण भूमिका

  • मोपत रेशन

  • आत्मनिर्भर भारत

  • सहयोग - समन्वयापासून सुशासनापर्यंत

  • आपली (मातृ) भाषा -आपले लोक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com