केंद्राच्या पाठ्यपुस्तकात चक्क हुंडा प्रथेचे केले जातेय समर्थन...

Priyanka chaturvedi|Shivsena|Central Government : टी.के.इंद्राणी यांनी लिहीलेल्या पुस्तकात हुंड्याचे खुले समर्थन असून हुंडा देण्याच्या प्रथेला कुरूप मुली बरोबर जोडले गेल्याने सामाजिक कार्यकर्त्यांचाही संताप वाढला आहे.
Priyanka chaturvedi
Priyanka chaturvedi Sarkarnama

नवी दिल्ली : हुंड्यासारख्या (Dowry) अनिष्ट सामाजिक पध्दतीला प्रोत्साहन देणारा व त्याची भलावण करणारा एक धडा केंद्र सरकारच्या (Central Government) अभ्यासक्रमात असल्याचे आढळल्याने तो वादाचा विषय ठरला आहे. शिवसेना (Shivsena) खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी याबाबत सांगितले की, हा धडा त्वरित वगळावा अशी विनंती मी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांना केली आहे. लग्नात हुंडा देण्याच्या दुष्ट प्रथेविरूध्द केंद्रासह विविध राज्य सरकारे विविध उपक्रम व जनजागृती महीमा राबवत असतानाच हा प्रकार घडल्याने सोशल मीडियावरही त्याची तीव्र प्रतीक्रिया उमटली आहे.

Priyanka chaturvedi
'थोरात माझे आदर्श मात्र मी माझ्या पत्रावर ठाम'

टी.के.इंद्राणी यांनी लिहीलेल्या एका पुस्तकात हुंड्याचे खुले समर्थन असून हुंडा देण्याच्या प्रथेला कुरूप मुली बरोबर यात जोडले गेल्याने सामाजिक कार्यकर्त्यांचाही संताप वाढला आहे. हे पुस्तक परिचारिका अभ्यासक्रमात अधिकृतरीत्या लावण्यात आले आहे. हाउस इन इंडिया हे पुस्तकाचे प्रकाशक आहेत.

खासदार चतुर्वेदी यांनी संसद परिसरात सांगितले की, हुंडा पध्दती किती चांगली आहे अशा प्रकारचे वर्णन असणारे पुस्तक एकविसाव्या शतकात आमच्या अभ्यासक्रमांत सामील असेल तर ती अत्यंत वाईट बाब आहे. केवळ स्त्रियांच्याच दृष्टीने नव्हे तर देश व राज्यघटना यासाठीही हे लाजिरवाणे आहे. हुंड्याला पाठिंबा देणारे परिच्छेदच्या परिच्छेद यात आहेत यातून आपण नव्या पिढीला कोणता अनिष्ट संदेश देत आहोत हे शिक्षण मंत्रालयाने पहायला हवे, असेही चतुर्वेदी यांनी सांगितले.

Priyanka chaturvedi
Video: आंबेडकरांचा फोटो वाटेल त्या लोकांबरोबर लावू नये; सचिन खरात

या पुस्तकात म्हटले आहे की, एखादी कुरूप मुलगी हुंड्याच्या बळावर कोणत्याही सुंदर मुलाशी लग्न करू शकते. हुंडा हा मुलींना मालमत्तेच्या किंवा संपत्तीच्या रूपात दिला जातो व हुंड्याच्या रकमेतून अनेक मुलींना नवे घर घेणे सुलभ होते. या पुस्तकातील वादग्रस्त मजकुराची पानेही सोशल मिडीयावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. त्यामुळएच आपण प्रधान यांना टॅग करून अभ्यासक्रमातून पुस्तक त्वरित हटविण्याची मागणी केल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com