Karnataka Assembly Election : काँग्रेसचं टेन्शन वाढलं, 'आप'नंतर 'हा' पक्षही उतरणार कर्नाटकच्या मैदानात

Congress in Karnataka : एमआयएम जेडीएस सोबत आघाडी करण्याच्या तयारीत
Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSarkarnama

MIM in Karnataka Election : कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. आता आम आदमी पक्षानंतर कर्नाटकात असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष 'एआयएमआयएम'ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.

विशेष म्हणजे २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 'एमआयएम'ने उमेदवार उभा केला नव्हता. मात्र जेडी (एस) ला पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत ओवेसी या विधानसभा निवडणुकीत २५ जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे. याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उस्मान घणी यांनी मंगळवारी (ता. ४) माहिती दिली.

Asaduddin Owaisi
Pimpri Chinchwad News : प्रश्नाचा पाठपुरावा लांडगे आणि जगतापांचा, लवकरच पुर्तता होणार ; बारणेंची घोषणा !

उस्मान घणी यांनी सांगितले की, "पक्ष राज्यात सुमारे २५ जागांवर निवडणूक लढवणार आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडी(एस) सोबत आघाडीसाठी बोलणी करत आहोत. परंतु अद्यापपर्यंत जेडी(एस)ने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आघाडीबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही."

Asaduddin Owaisi
Bhandara-Gondia LokSabha : परंपरा सुरु राहणार की इतिहास घडणार; भाजपमध्ये अनेक इच्छुक : पटोलेंची भूमिका महत्त्वाची

'एमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) म्हणाले की, "आम्ही निवडणूक युतीसाठी तयार आहोत. आतापर्यंत आम्ही तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. निवडणूक लढवणार आहोतच पण आमची युती होणार की नाही, यासाठी वाट पहावी लागेल."

दरम्यान, आपचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी कर्नाटक विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आपने कर्नाटकच्या निवडणुकीसाठी दुसरीही यादी जाहीर केली आहे. कर्नाटकमध्ये भाजप, काँग्रेस, जेडीएस, आप आणि एमआयएम पक्ष रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com