शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका!

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुकती करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मनाई केली आहे.
 Supreme Court, EWS Latest News
Supreme Court, EWS Latest NewsSarkarnama

नवी दिल्ली : राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्ती करण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मनाई केली आहे. आधीच याप्रकरणी सुनावणी प्रलंबित असताना नवीन सरकार पुन्हा नव्याने बारा आमदारांसाठी यादी बनवणार असल्याने सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी कोणतीही कारवाई सरकारने करू नये असे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे शिंदे सरकारला (Shinde Government) मोठा धक्का बसला आहे.

 Supreme Court, EWS Latest News
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाने ठाकरेंची डोकेदुखी वाढली; आता तीन शक्यता कोणत्या?

महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) सरकाने राज्यपालांनी विधान परिषदेवर १२ आमदारांची नियुक्त करावी, यासाठी पत्र दिले होते. मात्र, त्या पत्रावर राज्यपालांनी दीड वर्ष कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर राज्यात सत्तातर झाल्यानंतर राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेले पत्र फेटाळून लावले होते.

ठाकरे सरकारने पाठवलेला प्रस्ताव मागे घेण्याची विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवले होते. त्यावर ही यादी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर १२ नोव्हेंबर २०२० रोजी आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने कला, साहित्य, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रातील १२ प्रतिष्ठित व्यक्तींची यादी विधान परिषदेवर नियुक्तीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली होती. मात्र, कोश्यारींनी पावणेदोन वर्ष नियुक्त्यांवर कोणताही निर्णय घेतला नाही.

त्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी शिंदे-फडणवीस सरकार नव्याने देणार होते. त्यामध्ये भाजप आणि शिंदे यांना सहा-सहा जागा मिळणार आहेत, अशी चर्चा होती. विधान परिषदेसाठी नावेही फायन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र, आता न्यायालयाने आमदारांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला धक्का बसला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com