A.P. Shah News : देशात 'असहिष्णु आणि जातीयवादी' शक्तींमध्ये वाढ ; माजी न्यायमूर्तींनी मोदी सरकारला फटकारले

Bulldozer politics : विरोध करणाऱ्यांवर दबाव आणणे, माध्यमे आणि न्यायालयांना कमकुवत करणेही या बदलाची प्रमुख चिन्हे आहेत.
A.P. Shah
A.P. ShahSarkarnama

Delhi News : ' बुलडोझर हे आज सत्तेचे प्रतीक बनले आहे, निष्पाप लोकांचे जीवन आणि उपजीविका नष्ट केली जात आहे. बुलडोझरमुळे शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून याचे परिणाम विनाशाकडे घेऊन जाणारे आहेत. या कुटुंबांची जबाबदारी कोण घेणार, अशी प्रतिक्रिया दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए.पी. शाह यांनी दिली आहे.

देशात गेल्या काही महिन्यांपासून बुलडोझरच्या माध्यमातून मुस्लिम, अल्पसंख्यांकांची घरे पाडली जात आहे. या कारवाईमुळे हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. यावर ए.पी. शाह यांनी सडेतोड शब्दांत आपली भूमिका मांडली. " बुलडोझरच्या कारवायांमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुंटुंबांना पुन्हा आरसा मिळत नाही. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी कोण घेणार. धक्कादायक म्हणजे निष्पाप पीडितांना न्याय मिळाला असेल असे एकही प्रकरण नाही.अशी खंतही ए.पी, शाह यांनी व्यक्त केली आहे. (National Politics)

A.P. Shah
Rajasthan Politics : काँग्रेस खासदार गोगोईंनी घेतली भाजप नेत्या वसुंधरा राजेंची भेट ; फोटो व्हायरल

इतकेच नव्हे तर ए.पी. शाह यांनी, देशातील जातीयवादी राजकारण आणि शक्तींबाबतही चिंता व्यक्त केली आहे.'देशात 'असहिष्णु आणि जातीयवादी' शक्तींच्या वाढल्या आहेत. अतिरेकी विचारधारा अशा शक्तींना खतपाणी घालत आहेत. अल्पसंख्याकांसाठी, विशेषत: मुस्लिमांबद्दल द्वेष, ध्रुवीकरण आणि तिरस्काराची संस्कृती देशभर रुजत चालली आहे. अशी चिंता व्यक्त करत त्यांनी, भारतातील न्यायालयांसारख्या औपचारिक संस्था कमकुवत होण्याची आणि त्यांच्यावरील जनतेचा विश्वास कमी होत चालला असल्याकडेही लक्ष वेधले आहे.

भारतातील सरकार आणि लोकशाहीचे मुल्यांकनही करताना न्यायमूर्ती शाह म्हणाले, निवडणुकीला वैधता असूनही, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या कृतींमुळे लोकशाही तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तींचे प्रमाण वाढत चालले आहे. केंद्रीय संस्थांवर नियंत्रण आणणे, विरोध करणाऱ्यांवर दबाव आणणे, माध्यमे आणि न्यायालयांना कमकुवत करणेही या बदलाची प्रमुख चिन्हे आहेत. उदारमतवादी आणि सहिष्णू धर्म म्हणून हे हिंदू धर्माच्या मूळ तत्वाच्या विरुद्ध आहे.असंही त्यांनी नमुद केलं आहे.

A.P. Shah
One Nation One Election : 'एक देश, एक निवडणुकी'वर राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले, इंडिया म्हणजे..

न्यायमूर्ती शाह म्हणाले, स्वातंत्र्य लढा आणि संविधान बनवताना दुर्लक्षित झालेली ही विचारधारा आता प्रभावशाली झाली आहे. त्यामुळे लोकशाही मागासलेली आहे आणि अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in