Missing Women NCRB Data: 'केरला स्टोरी'वरून रान उठवणाऱ्या भाजपाला विरोधकांनी दाखवलं गुजरातमधील वास्तव !

Missing Women NCRB Data | विरोधकांनी गुजरातमधील गेल्या पाच वर्षातील बेपत्ता महिला, मुलींची आकडेवारीच जाहीर केली आहे.
Missing Women NCRB Data:
Missing Women NCRB Data:Sarkarnama

Missing Women NCRB Data : 'द केरळ स्टोरी' चित्रपटावरुन देशभरात जोरदार वाद सुरू आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटांवर बंदी घातल्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये राजकारण शिगेला पोहचलं आहे. अशातच नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी केवळ केरळमधील नाही, तर देशातील इतर राज्यांतील आहे. देशात दररोज शेकडो महिला आणि अल्पवयीन मुली कशा गायब (Missing Women) होत असल्याची ही आकडेवारी आहे. ही आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ची आहे. (The opponents of the BJP, which is doing politics on 'Kerala Story', showed the reality in Gujarat)

देशात एका वर्षात किती मुली बेपत्ता होतात आणि कोणती राज्ये यामध्ये आघाडीवर आहेत, याची सविस्तर आकडेवारी यात देण्यात आली आहे .द केरळ स्टोरी (The Kerala Story) चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हेच खरे सत्य असल्याचा प्रचार भाजपकडून केला जात आहे. केरळमधून अनेक मुली गायब झाल्या आणि कुणालाही कळलेदेखील नाही.पीएम मोदींनीही निवडणूक मंचावरून या चित्रपटाचा उल्लेख केला. भाजप (BJP) शासित राज्येही हा चित्रपट करमुक्त करत आहेत.

Missing Women NCRB Data:
Teacher Recruitment : पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची भरती करणार; केसरकरांची मोठी घोषणा

पण केरळबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या भाजपला तोंड देण्यासाठी विरोधी पक्षांकडून एनसीआरबी डेटाच जाहीर करण्यात आला आहे. ज्यामध्ये धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. भाजपशासित गुजरात राज्यात गेल्या 5 वर्षात 40 हजार मुली गायब झाल्याचा दावा करण्यात आला आहे. गुजरातशिवाय महाराष्ट्रासारख्या (Maharashtra Missing Womens) राज्यांची आकडेवारीही आश्चर्यकारक आहे.

NCRB चे आकडे काय सांगतात

एनसीआरबी'च्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये एकूण देशभरात एकूण 3,89,844 लोक बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. ज्यामध्ये 2,65,481 महिला होत्या. 2020 च्या तुलनेत हा आकडा खूप जास्त होता. अहवालानुसार, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये बेपत्ता प्रकरणांमध्ये 20.6% वाढ झाली आहे. पण आकडेवाडीनुसार यातील अनेक बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात यश आल्याचंही आढळून आलं आहे.

Missing Women NCRB Data:
Rajaram Sugar Factory : 'राजाराम'च्या अध्यक्षपदी अमल महाडिकांची निवड, तर उपाध्यक्षपदी नारायण चव्हाण !

दरम्यान, केरळमध्ये एकूण 6608 महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. ज्यामध्ये 2021 पर्यंत 6242 महिलांचा शोध घेण्यात यश आले आहे.म्हणजेच एका वर्षात 366 शोधण्यात अपयश आले आहे. तर अल्पवयीन मुलींबद्दल पाहिलं तर एकूण 951 मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली होती, त्यापैकी 2021 पर्यंत 919 मुली पुनर्प्राप्त झाल्या होत्या.मात्र 32 मुलींचा शोध लागू शकला नाही.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com