हिंदूत्त्ववादी विचारांच्या योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळातील एकमेव मुस्लिम मंत्री

Uttar pradesh| Yogi Adityanath| हिंदूत्त्ववादी विचारांना प्राधान्य देणाऱे आणि हिंदूत्व जगणारे मंत्री म्हणून योगी आदित्यनाथांची ओळख आहे.
दानिश आजाद अन्सारी
दानिश आजाद अन्सारी

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी शुक्रवारी (२५ मार्च) दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्रीमंडळातील इतर ५२ मंत्र्यांनाही शपथ देण्यात आली. हिंदूत्त्ववादी विचारांना प्राधान्य देणाऱे आणि हिंदूत्व (Hinduttva) जगणारे मंत्री म्हणून योगी आदित्यनाथांची ओळख आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत हिंदूत्त्ववादाच्या मुद्दा चांगलाच चर्चेत होता. अशा योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळात काल एकमेव मुस्लिम (Muslim) नेत्याने मंत्रीपदाची शपथ घेतली.

योगी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये मुस्लिम चेहरा असलेल्या मोहसीन रझा यांच्या जागी आता भाजपने दानिश आजाद अन्सारी यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. विशेष म्हणजे, दानिश आजाद हे योगी सरकारमध्ये एकमेव मुस्लिम मंत्री आहेत. दानिश यांनीदेखील राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान दानिश यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दानिश यूपीमधील मुस्लिमांच्या भल्यासाठी काम करणार, असल्याची प्रतिक्रीया त्यांच्या भावाने दिली आहे.

दानिश आजाद अन्सारी
ठाकरेंनी विरोधकांना सुनावले, 'घाबरत नाही आम्ही, लढत राहू'

कोण आहेत दानिश आजाद-

योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मुस्लिम चेहरा म्हणून सामील झालेले राज्यमंत्री दानिश आझाद हे विद्यार्थी राजकारणातून आले असून ते भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. पूर्वांचलमधील बलिया येथील रहिवासी असलेले दानिश आजाद हे मुस्लिम ओबीसीमधील अन्सारी जातीचे आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात ते भाषा समितीचे सदस्य होते.

- विद्यार्थी राजकारणाची सुरुवात अभाविपपासून झाली

दानिश आजाद हे प्रदीर्घ काळापासून राजकारणात सक्रिय आहेत. लखनौ विद्यापीठात विद्यार्थी राजकारणातून राजकीय इनिंग सुरू करणाऱ्या दानिश आझाद यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत विविध पदे भूषवली. 2017 मध्ये राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांना भाषा समितीचे सदस्य करण्यात आले. आजाद हे अल्पसंख्याक समाज आणि तरुणांच्या संघटनेसाठी ओळखले जातात. त्यांच्या कामाची दखल घेत यंदा योगी आदित्यनाथ यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रदेश सरचिटणीसपद दिले आहे.

- दानिश हे अन्सारी समाजातील प्रतिनिधी

भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस असताना दानिश आजाद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोदी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे लक्ष मुस्लिम पसमंदा जातीवर आहे. ज्यासाठी मोहसीन रझा यांच्या जागी दानिश आजाद यांची निवड करण्यात आली. मोहसीन रझा हे शिया आणि मुस्लिम उच्च जातीतून येतात, तर दानिश हे मुस्लिम ओबीसींच्या अन्सारी समुदायातून येतात.

- उत्तर प्रदेशात अन्सारी समाजाची मोठी लोकसंख्या

युपीत मुस्लिमांमध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही अन्सारी समाजाची आहे, परंतु त्यांचा सत्तेतील सहभाग त्यांच्या लोकसंख्येपेक्षा कमी आहे. तसेच पसमंदा समाजातील इतर जातींच्या जागी मुस्लिम समाजातील उच्च जाती शेख, पठाण, सय्यद, मुस्लिम राजपूत आणि मुस्लिम त्यागी आहेत. अशा परिस्थितीत भाजपची आपले लक्ष ओबीसी मुस्लिम समाजावरही केंद्रीत केले आहे.

- राजकीय खेळी

या एपिसोडमध्ये योगी सरकारच्या मागील कार्यकाळात अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद सैफी समाजाला देण्यात आले होते, तर भाजप अल्पसंख्याक मोर्चाला सर्व पदांवर स्थान देण्यात आले होते. अशा परिस्थितीत आता अन्सारी समाजातील दानिश आजाद यांना मंत्री बनवून योगी सरकारमध्ये मोठी राजकीय खेळी करण्यात आली आहे.

- मोहसीन रझा यांना डावल्याचे कारण

पाच वर्षे मंत्री असतानाही मोहसीन रझा कोणताही राजकीय प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळे योगी सरकारने यंदाच्या कार्यकाळात मोहसीन रझा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार मोहसीन रझा यांना त्यांच्या शिया समुदायालाही भाजपसोबत ठेवता आले नाही. त्यामिळे लखनौमध्ये भाजपला एक जागा गमवावी लागली. तर मोहसीन रझा हे स्वतः लखनौचे आहेत.

याशिवाय पाच वर्षे मोहसीन रझा यांनी भाजपचा राजकीय पाया मजबूत करण्याऐवजी केवळ भाषणबाजीच करत राहिले. त्यामुळे या निवडणुकीत 85 टक्के मुस्लीम मते सपाला गेली, जी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भाजपला केवळ आठ टक्के मुस्लिम मते मिळाली, त्यामुळे मोहसीन रजा यांची खुर्चीही गेली.

मात्र, लखनौमधील शिया समुदाय काही काळापासून भाजपच्या बाजूने मतदान करत आहे. अटलबिहारी वाजपेयी ते लालजी टंडन आणि राजनाथ सिंह यांना मतदान केले, पण यावेळी ते एकत्र राहिले नाहीत. अशा स्थितीत ओबीसी मुस्लिम मतांमध्ये सहभागी होण्याच्या दिशेने भाजपने मोहसीन रझा यांच्याऐवजी दानिश आजाद यांना मंत्रिमंडळात प्रवेश दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com