नितीश कुमार जिंकले; पण दुसरीकडे आरजेडीच्या नेत्यांवर सीबीआयचे छापे!

विश्वासदर्शक ठरावेळी नितीश कुमार (Nitish Kumar) यांचे भाजपवर गंभीर आरोप
Nitish Kumar, Jejaswi Yadav
Nitish Kumar, Jejaswi Yadavsarkarnama

Nitish Kumar : पाटणा : प्रमुख विरोधी पक्ष भाजपने (BJP) सभात्याग केल्यानंतर बिहारमधील नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या महागठबंधन सरकारने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला. यापूर्वी विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेदरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडला संपवण्याचा कट भाजपने रचल्याचा गंभीर आरोप केला.

यावेळी नितीश कुमार म्हणाले, पूर्वी चार पक्ष होते पण आज आठ पक्ष आमच्यासोबत आहेत. नंदकिशोर यादव यांना विधानसभा अध्यक्ष करणार असे आम्हाला सांगण्यात आले होते. मात्र, विजय सिन्हा यांना अध्यक्ष केले. 2020 मध्ये मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. मात्र, भाजपच्या दबावाखाली बनवावे लागले. मला काहीही बनण्याची इच्छा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Nitish Kumar, Jejaswi Yadav
शहा,नड्डांनी दिल्या चंद्रशेखर बावनकुळेंना 'टिप्स'

विधानसभा निवडणुकीत भाजपने जेडीयूला संपवण्याचे षडयंत्र रचले, भाजपने सर्व जुन्या नेत्यांना बाजूला केले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही (भाजप) कुठे होता, असा सवालही त्यांनी केला. ते म्हणाले की, भाजपचे काम फक्त अस्वस्थता निर्माण करणे आहे. केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, केंद्राने पाटणा विद्यापीठाची मागणीही मान्य केली नाही. 2017 मध्ये केंद्राने 600 कोटी दिले.

हर घर नलची सुरुवात 2015 मध्ये झाली होती, त्यावेळी RJD हा एकमेव मित्र होता. बिहारमध्ये रस्तेबांधणी राज्य सरकारने केली, केंद्र सरकारने केली नाही. अटलजी आजारी पडले तेव्हा अडवाणीजींना सत्ता मिळायला हवी होती, पण तसे झाले नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. माझ्याविरोधात बोलाल तरच तुम्हाला केंद्र सरकारकडून पुरस्कार मिळेल, असा टोला गदारोळ करणाऱ्या भाजप नेत्यांना नितीशकुमार यांनी लगावला. भाजपच्या बहिष्कारावर नितीश कुमार म्हणाले, तुम्हाला वरून सांगण्यात आले असेल म्हणून तुम्ही लोक बाहेर गेलात.

Nitish Kumar, Jejaswi Yadav
तुमच्याच घराशेजारी डान्सबार सुरू आहे : अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

दरम्यान, सीबीआयने बुधवारी नितीश कुमार यांच्या सरकारच्या विश्वासमत प्रस्तावाआधी बिहारमध्ये कथित रेल्वेभरती घोटाळ्यासंदर्भात छापे टाकले. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) खासदार अशफाक करीम, फयाज अहमद आणि आमदार सुनील सिंग यांच्या घरावर हे छापे टाकण्यात आले. सीबीआयकडून जवळपास 24 ठिकाणी छापे टाकण्यात आले. यामध्ये दिल्ली, गुरुग्राम, पाटणा, कटिहार, मधुबनी यांचा समावेश आहे. गुरुग्राममध्ये अर्बन क्यूब 71 मॉल आहे, ते तेजस्वी यादव आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींवर देखील छापेमारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे. यात काही अर्थ नाही. छाप्यांच्या भितीने आमदार आपल्या पक्षात येतील यासाठी ते असे करत आहेत, असा आरोप आरजेडीने भापवर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com