शिंजो आबे यांची हत्या का केली? कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Shinzo Abe| Japan| त्या दिवशीचा शिंजो आबे यांचा हा दौरा घाईघाईने आखण्यात आला होता.
shinzo abe death news
shinzo abe death news

टोक्यो : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे जपानच्या (Japan) नारा या शहरात शुक्रवारी (8 जुलै) गोळी झाडून हत्या करण्यात आली. एका निवडणूक प्रचार सभेत भाषण करत असताना एका 41 वर्षीय इसमाने त्यांच्यावर गोळी झाडली. शनिवारी त्यांचे पार्थिव टोक्योत आणण्यात आले. ‘क्योडो न्यूज’च्या वृत्तानुसार, शिंजो आबे यांची हत्या करणाऱ्या संशयित तेत्सुया यामागामी (४१) याने त्यांच्या हत्येचा कट रचल्याचे मान्य केले आहे. (Shinzo Abe latest news update)

शिंजो आबे यांचे एका विशिष्ट धार्मिक संघटनेशी संबंध असल्याचा त्याला संशय होता. त्याची आई या धार्मिक संघटनेशी संबंधित होती. या संघटनेचा तो कट्टर विरोधक व द्वेष करायचा. त्यामुळे त्याने आबे यांच्या हत्येचा कट रचला. या धार्मिक संघटनेचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र जपानमधील निवडणुकांच्या दरम्यान आबेंची आशा प्रकारे हत्या झाल्याने संपूर्ण जपान सुन्न झाला आहे.

shinzo abe death news
फडणवीस-तावडेंची कित्येक दिवसांनी गळाभेट; दिल्ली दौऱ्यात दोघांनीही जपला भावनिक बंध

शवविच्छेदन अहवालाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंजो आबे यांच्या पाठीला डाव्या बाजूला वर गोळी लागली होती. त्यामुळे त्यांच्या धमन्यांना मोठी इजा झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शनिवारी (9 जुलै) आबे यांचे पार्थिव टोक्योच्या शिबुया येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. या वाहनात पार्थिवासह आबे यांच्या पत्नी अकीही बसल्या होत्या. त्यांच्या निवासस्थानी त्यांचे चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. पार्थिव असलेली मोटार लोकांच्या समोरून गेली, तेव्हा सर्वानी झुकून आबे यांच्या पार्थिवाला अभिवादन केले.

जपानमधील राजकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशीचा शिंजो आबे यांचा हा दौरा घाईघाईने आखण्यात आला होता. त्यामुळे नारा शहरात सभास्थानी व्यासपीठाची व्यवस्था करता आली नाही. शिंजो आबे जमिनीवर उभे राहून भाषण करत होते. ज्यामुळे आबे यांना सहजपणे लक्ष्य करण्यात आले.

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या काही चित्रफितीत, यामागामी आपल्या खांद्यावर देशी बनावटीची बंदूक टांगलेली दिसत होता. तो रस्त्यावर आबेपासून काही मीटर अंतरावर उभा राहून सतत आजूबाजूला पाहत होता. आबे यांनी भाषण सुरू केल्यानंतर काही मिनिटांतच त्याने पहिली गोळी झाडली पण ती आबे यांना लागली नाही. गोळीचा आवाज कुठून आला हे पाहण्यासाठी आबे यांनी मागे पाहिले तेव्हा दूसरी गोळी आबे यांच्या डाव्या बाजूस लागली आणि ते जमिनीवर कोसळले. सुरक्षा रक्षकाने गोळीबार रोखण्यासाठी ‘बुलेटप्रूफ ब्रीफकेस’ उचलली तो पर्यंत दुसरी गोळी आबे यांना लागली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in