काँग्रेसचे अखेर ठरले; अध्यक्ष पदाची निवडणूक होणार

अनेक दिवसांपूसन चर्चेत असलेली काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे
Congress Latest Marathi News
Congress Latest Marathi NewsSarkarnama

Congress : नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार, याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. अखेर काँग्रेसने कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकीची तारीख निश्चित केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

दिल्लीत आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) उपस्थित होते. या व्यतिरिक्त हरीश रावत, सलमान खुर्शीद, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, कुमारी सेलजा, मधुसूदन मिस्त्री, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, अजय माकन, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ट नेते या बैठकीला काँग्रेस कार्यालयात उपस्थित होते.

Congress Latest Marathi News
पायऱ्यांवरील गोंधळ : आमदार वर्तणूक नियमावली समितीचा अहवाल एका महिन्यात

या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. 22 सप्टेंबरला अधिसूचना जारी होणार आहे. 24 सप्टेंबरपासून नामनिर्देशन सुरू करण्यात येणार आहे. 17 ऑक्टोबरला मतदान होईल व 19 ऑक्टोबरला मतमोजणी आणि लगेच निकाल जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या सीडब्लूसीचे (CWC) शिक्कामोर्तब झाल्यानंतर निवडणुकीची औपचारिक घोषणा केली जाईल.

Congress Latest Marathi News
‘मला जेलमध्ये टाकण्याच्या तारखा दिल्या जात आहेत’

दरम्यान, बैठकीत पक्षावर नाराज असलेले आनंद शर्माही उपस्थित होते. आनंद शर्मा यांनी शनिवारी काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीत अनेक नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी विचारणा केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com