मोठी बातमी! सोनिया गांधी आणि राहुल गांधीना ईडीची नोटीस

Sonia Gandhi Rahul Gandhi| ED Action| नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे.
मोठी बातमी! सोनिया गांधी आणि राहुल गांधीना ईडीची नोटीस
Sonia Gandhi Rahul Gandhi|

Sonia Gandhi Rahul Gandhi ED Action

नवी दिल्ली : राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधींना (Rahul Gandhi) इडीची नोटीस आल्याची माहिती समोर आली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. ईडीने 8 जून रोजी सोनिया गांधी यांना चौकशीसाठी बोलावले आहे. (ED Action in National Herald Case)

तर सरकार सूडाच्या भावनेने आंधळे झाले आहे. आम्हाला घाबरवण्यासाठी हे केले जात आहे, पण आम्ही घाबरणार नाही आणि झुकणार नाही. धैर्याने सामोरे जाऊ, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली आहे.

Sonia Gandhi Rahul Gandhi|
काँग्रेससोबत काम न करण्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले कारण..

"2015 मध्ये, ED ने नॅशनल हेराल्ड केस बंद केली. पण सरकारला ते आवडले नाही आणि त्यांनी संबंधित ED अधिकार्‍यांना सेवेतून काढून टाकले. त्यांच्याजागी नवे अधिकारी नेमले आणि केस पुन्हा उघडली. हे महागाई, बेरोजगारी आणि इतर समस्यांपासून लक्ष हटवण्यासाठी आहे. पण आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सांगितले. (rahul gandhi today news)

नॅशनल हेराल्ड प्रकरण इक्विटी व्यवहारात 2,000 कोटींहून अधिक मालमत्तेच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित आहे. काँग्रेसचे मुखपत्र, नॅशनल हेराल्ड, यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवणाऱ्या असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) च्या संपादनामध्ये फसवणूक, कट रचणे आणि गुन्हेगारी विश्वासाचा भंग केल्याचा आरोप या प्रकरणात ठेवण्यात आला आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना काही दिवसांपूर्वीही नोटीस बजावण्यात आली आहे. एप्रिलमध्ये, ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात माजी केंद्रीय मंत्री पवन बन्सल, ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची चौकशी केल्याचे सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in