Wrestlers Protest: राकेश टिकैत यांनी काढली कुस्तीपटूंची समजूत; सरकारला दिला पाच दिवसांचा अल्टीमेटम

Wrestlers Protest News: पदकं गंगेच्या पात्रात टाकण्याचा निर्णय मागे; कुस्तीपटू ढसाढसा रडले...
Wrestlers Protest:
Wrestlers Protest: Sarkarnama

Delhi: गेल्या एक महिन्यापासून दिल्लीत महिला कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू आहे. खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर या कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.

कुस्तीपटूंच्या या आंदोलनाला सरकारकडून कोणतीही दाद देण्यात येत नसल्याने कुस्तीपटूं उद्वीग्न झाले. कुस्तीपटूंनी उद्वीग्न होत मिळालेली ऑलिम्पिकची पदकं हरिद्वार येथील गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ते गंगा नदीच्या तिरावर दाखलही झाले होते. मात्र, गंगा नदीच्या पात्रात ऑलिम्पिकची पदकं विसर्जित करण्याचा निर्णय तुर्तास मागे घेतला आहे.

Wrestlers Protest:
Wrestlers Protest: महिला कुस्तीपटूंचं आंदोलन पोलिसांकडून चिरडण्याचा प्रयत्न; महिला आयोगाने संतप्त होत थेट..

कुस्तीपटूंना ऑलिम्पिकची मिळालेली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याची परिस्थिती आल्याने ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी गंगा नदीच्या तिरावर कुस्तीपटू ढसाढसा रडले. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मध्यस्थी करत ऑलिम्पिकची मिळालेली पदकं गंगा नदीत विसर्जित न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी आपला निर्णय मागे घेतला आहे.

दरम्यान, कुस्तीपटूंनी एवढी मेहनत करुन जिंकलेली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याची वेळ आल्यामुळे कुस्तीपटूंना अश्रू अनावर झाले होते. शेतकरी नेत्यांनी मध्यस्थी केल्याने त्यांनी तुर्तास आपला निर्णय मागे घेतला आहे. यानंतर कुस्तीपटूं गंगा नदीच्या पात्रातून माघारी परतले आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com