New Parliament Building Inauguration पंतप्रधान मोदींचा मास्टरस्ट्रोक; संसदेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पणाची तारीख ठरली

Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाला २६ मे रोजी नऊ वर्ष पूर्ण होत आहेत.
Narendra Modi News
Narendra Modi NewsSarkarnama

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाला २६ मे रोजी नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हेच औचित्य साधून मोदी नव्या संसदेच्या इमारतीचे लोकार्पण करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संसदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण कधी होणार? याची तारीख समोर आली आहे. २८ मे ला मोदी नवीन संसद भवनाचे लोकार्पण करणार आहेत. लोकसभा सचिवालयाने याबाबतची माहिती दिली.

Narendra Modi News
Uddhav Thackeray News : लोकसभेच्या तयारीत ठाकरेंनी घेतली आघाडी; पहिला उमेदवारही ठरला? पदाधिकाऱ्यांना दिले आदेश

या संदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. त्यांनी मोदींना नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आमंत्रित केले. नवीन संसद भवनाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. संसदेची नवीन इमारत आत्मनिर्भर भारताचे प्रतीक असेल, असे लोकसभा सचिवालयाने म्हटले आहे.

Narendra Modi News
BJP State Executive Meeting News : भाजपच्या ढुढ्ढाचार्यांना फडणवीसांचे राष्ट्रीय अध्यक्षांसमोरच टोले; कार्यकारिणीत काय घडले?

संसदेच्या या नव्या इमारतीचे भूमिपूजन २०२० मध्ये झाले होते. सध्याच्या संसदेच्या इमारतीच्या जवळच ही इमारत बांधण्यात येत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी साधारण १ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. विशेष म्हणजे या इमारतीत एकूण ५ हजार कलाकृती साकारण्यात येणार आहेत. त्रिकोणी आकार असलेली ही चार मजली इमारत एकून ६४ हजार ५०० स्केअर किलोमीटर परिसरात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com