देश पुन्हा लॉकडाऊनच्या वाटेवर; दिल्लीने चिंता वाढवली

Covid 19| Delhi| Corona virus| केंद्राचे पाच राज्यांना हाय अलर्ट राहण्यासाठी पत्र
Covid 19| Delhi |Covid 19 news updates, Coronavirus News Updates
Covid 19| Delhi |Covid 19 news updates, Coronavirus News Updates

नवी दिल्ली : गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे (Corona virus) सर्व निर्बंध हटवण्यात आले. मास्क लावणेही ऐच्छिक करण्यात आले. मास्क सक्ती हटवण्यात आल्यामुळे नागरिकांनीही दोन वर्षनंतर मोकळा श्वास घेतला. पण आता पुन्हा देशावर कोरोनाचे संकट घोंगवू लागले आहे. शेजारच्या चीनमध्ये कोरोना संसर्ग वाढू लागल्याने तिथे लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे, तर भारतातही (India) गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. (Covid 19 news updates)

राजधानी दिल्लीतील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे प्रशासनाची चिंता वाढली असून दिल्ली प्रशासन हायअलर्टवर आले आहे. वाढच्या रुग्णसंख्यांच्या पार्श्वभूमीवर आज दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची (DDMA) महत्त्वाची बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपराज्यपालाच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा केली जाईल. तसेच या बैठकीत देशात पुन्हा मास्क सक्ती लागू करण्याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आहे.

Covid 19| Delhi |Covid 19 news updates, Coronavirus News Updates
देशभरातील हिंसाचाराच्या घटना थांबवण्यासाठी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह पाच राज्यांना पत्र पाठवले असून राज्यांना अलर्ट राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चौथ्या लाटेचा धोका केंद्र सरकारने वर्तवला आहे. त्यासाठी केंद्राने पाच राज्यांना पत्र लिहून खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत.

केंद्रसरकारने महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांना पत्र लिहित अलर्ट राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. या राज्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजनेसाठी पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2,067 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर कोविड पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 65.7 टक्के वाढ झाली आहे.तर गेल्या 24 तासात जवळपास 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह, कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या 522,006 झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com