Narendra Modi : 'एक देश-एक पोलिस गणवेश' या संकल्पनेचा विचार व्हावा : मोदींचे राज्यांना आवाहन!

विविध राज्यांची ओळख पुसून केंद्र सरकारडून आपली शक्ती राज्यावर प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न आहे का?
NArendra MOdi
NArendra MOdiSarkarnama

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका महत्त्वाच्या घोषणाचे सुतोवाच केले आहे. देशभरातील पोलिसांच्या गणवेशासंदर्भात एक महत्त्वाचे भाष्य केले आहे. देशभरातील पोलिसांसाठी 'एक देश - एक पोलिस गणवेश' या संकल्पनेचा विचार व्हावा असे मोदींनी सुचवले आहे. यामुळे आता देशभरातील, विविध राज्यातील पोलिसांचे गणवेश एकच होणार का? अशी चर्चा होत आहे. यावर आता विविध उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.

'एक देश - एक पोलीस गणवेश' या संकल्पनेवर चर्चा करावी अशी विविध राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी सकारात्मक चर्चा करावी असे पंतप्रधान मोंदींनी आवाहन केले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विविध राज्याच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला संबोधित करताना मोदींनी हे आवाहन केलं आहे. पोलिस हा राज्यसूची अंतर्गत येणारा विषय आहे, त्यामुळे प्रत्येक राज्याने आपापल्या पोलिसांसाठी वेगवेगळा गणवेश ठरवलेला आहे. मात्र 'एक देश - एक पोलिस गणवेश' या संकल्पनेवर विविध राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी विचार करावा, असे आवाहन आता मोदींनी केलं आहे.

NArendra MOdi
Aaditya Thackeray : चार प्रकल्प महाराष्ट्रातून गेले, आता तरी उदय सामंत राजीनामा देणार का ?

मोदी म्हणाले, "पोलीस गणवेशाबाबत एक असा दृष्टीकोन बाळगला जाऊ शकतो. आपले सर्व राज्यांनी एकत्रित येऊन निर्णय घेऊ शकतात का? यातून खूप लाभ होईल. गुणवत्ता सुधारली जाईल. देशातला कोणताही नागरिक देशात कुठेही गेला तरी त्याला गणवेशावरून पोलिसाला ओळखता येईल. गणवेशावर संबंधित राज्याचं एक टॅग असू शकेतो, एक नंबर असू शकतो. पण पोलिसांची ओळख गणवेशामुळ सामन्यपणे ओळख होईल. मी याचा आग्रह करत नाही, मी फक्त माझा विचार सांगतो आहे."

NArendra MOdi
दिल्लीतील योगवर्ग होणार एक नोव्हेंबरपासून बंद; 'आप'चा भाजपवर हल्लाबोल!

मात्र आता यावर काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विविध राज्यांची ओळख पुसून केंद्र सरकारकडून आपली शक्ती राज्यावर प्रस्थापित करण्याचा हा प्रयत्न आहे का? पोलिस हा राज्यसूची अंतर्गत येणारा विषय आहे, मात्र असा निर्णय़ पुढे आणून केंद्राकडून राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर आपला वचक निर्णय करायचा प्रयत्न केला जातो का? इत्यादी प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in