Congress News : कॉंग्रेसच्या नव्या कार्यकारिणीची लवकरच रचना ; सोनिया, राहुल गांधी यांचं स्थान काय राहणार?

अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कॉंग्रेसमध्ये दिवसेंदिवस हालचाली वाढू लागल्या आहेत.
Sonia Gandhi and Rahul Gandhi in Congress Chintan Shivir
Sonia Gandhi and Rahul Gandhi in Congress Chintan ShivirSarkarnama

Congress News : अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कॉंग्रेसमध्ये दिवसेंदिवस हालचाली वाढू लागल्या आहेत. भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसचे (Congress) 85 वे पूर्ण अधिवेशन 24 फेब्रुवारी 2023 पासून रायपूरमध्ये सुरू होणार आहे. राजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, कृषी, सामाजिक न्याय आणि युवकांचा रोजगार या सहा मुद्द्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती, काँग्रेसचे संघटनेचे प्रभारी सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिली.

विशेष बाब म्हणजे, या अधिवेशनात काँग्रेस वर्किंग कमिटीची (Congrss) निवडणुकही होण्याची शक्यता वर्तववण्यात आली आहे. या कमिटीत कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया (Soniya Gandhi) गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) या दोन माजी अध्यक्षांना वर्किंग कमिटीत नेमकं कोणतं स्थान मिळणार, याबाबतही चर्चा सुरु झाली आहे. या अधिवेशनात काँग्रेसच्या या नव्या रचनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सोनिया आणि राहुल गांधी यांना काँग्रेस वर्किंग कमिटीत कायमस्वरुपी स्थान देण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. कॉंग्रेसची ही वर्किंग कमिटी ही काँग्रेस पक्षासाठी निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे.

Sonia Gandhi and Rahul Gandhi in Congress Chintan Shivir
Urfi Javed- Chitra Wagh Dispute : 'संजय आठवतो का...?' उर्फीने चित्रा वाघांच्या जखमेवर मीठ चोळले...

अशी असते कॉंग्रेस वर्किंग कमिटीची रचना ?

वर्किंग कमिटीत (CWC) पक्षाध्यक्षांसह 25 सदस्य असतात. या कार्यकारिणीत एक अध्यक्ष, एक संसदीय पक्षाचा नेता आणि इतर 23 सदस्य अशी रचना असते. यापैकी 12 सदस्य हे निवडणुकीद्वारे निवडून येतात. तर बाकीचे अध्यक्षांकडून नियुक्त होत असतात. पक्षासाठी निर्णय घेणारी ही सर्वोच्च समिती असते.

वर्किंग कमिटीची निवडणूक व्हावी ही जी 23 गटाचीही मागणी होती. त्यामुळे आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीपाठोपाठ इथेही काँग्रेस निवडणुकीतून नियुक्त्या करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय 2023 मध्ये छत्तीसगड राज्यात निवडणुका होणार आहेत. तर लोकसभा निवडणुकीला एक वर्ष उरलं असताना आता काँग्रेस वर्किंग कमिटीतल्या या निवडणुकांमुळे पक्षात काय बदल होतो, हे ही पाहणं महत्वाचं असेल.

दरम्यान, येत्या 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप होत आहे. त्यानंतर आता काँग्रेसचं हे महाअधिवेशन पक्षासाठी मोठा इव्हेंट असणार आहे. भारत जोडो यात्रा आणि त्यानंतर होणाऱ्या या कमिटीची निवडणूक पक्षाला कशी आणि किती बळकटी देते हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com