Vinod Tawde News: मोदी, शाहंचा तावडेंवर वाढला विश्वास; सोपवली 'ही' मोठी जबाबदारी

Maharashtra Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पायाभूत रणनीतीसाठी नेमली समिती
Vinod Tawde, Amit Shah and Narendra Modi
Vinod Tawde, Amit Shah and Narendra ModiSarkarnama

BJP News: आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यास भाजपने आतापासूनच सुरवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून विनोद तावडेंसह तीन संघटन महा सचिवांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पायाभूत रणनीतीसाठी समितीचे निमंत्रक म्हणून विनोद तावडे, सुनील बन्सल आणि तरुण चुग यांच्यावर केंद्र आणि राज्य पातळीवरील नेत्यांचे कार्यक्रम आणि ज्या ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथे उमेदवार ठरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Vinod Tawde, Amit Shah and Narendra Modi
Maharashtra Budget Session: टोमणे अन् आरोप-प्रत्यारोप करीत महिला आमदारांनी गाजविले सभागृह

सरचिटणीस विनोद तावडे, हे समितीचे निमंत्रक असणार आहेत. तर सुनील बन्सल आणि तरुण चुग हे या टीममध्ये काम करणार आहेत. तसेच अन्य पदाधिकारी त्यांच्यासोबत असतील. पक्षाच्या केंद्रीय आणि राज्य कार्यकारिणीच्या वरिष्ठ नेत्यांचे कार्यक्रम ही टीम निश्चित करणार आहे.

गेल्या निवडणुकीत ज्या मतदारसंघांत पक्षाचे उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले तेथील उमेदवार ठरवणे, राजकीय रणनीती ठरवणे, संघटनात्मक कार्यक्रम राबवणे आणि मतदारांना पक्षाशी जोडण्याचे काम ही टीम करणार आहे.

Vinod Tawde, Amit Shah and Narendra Modi
Maharashtra Budget Session: टोमणे अन् आरोप-प्रत्यारोप करीत महिला आमदारांनी गाजविले सभागृह

लोकसभा मतदारसंघानुसार मुद्यांची जुळवाजुळव करणे, वरिष्ठ नेत्यांच्या भाषणाचा मजकूर गोळा करणे आणि दळणवळणाच्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी यांच्यावर असणार आहे. तसेच ही टीम लवकरच आपले काम सुरू करणार आहे.

दरम्यान, विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदानंतर आता पुन्हा मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा त्यांच्यावरील विश्वास अधिक वाढल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com