महिला आयोगाच्या अध्यक्षांना व्हॉट्सअॅपवर कॉलगर्ल्सचे रेट, वाचा काय आहे प्रकरण

सोशल मीडियामुळे लोक एकमेकांशी जोडले जात असले तर याच माध्यमातून अवैध धंद्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे
 Swati Maliwal
Swati Maliwal

दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या (Delhi Commission for Women)अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक माहिती शेअर आहे. 'मी जस्ट डायलवर स्पा मसाजसाठी खोटी चौकशी केल्यानंतर त्यावरुन मला आलेल्या मेसेजमध्ये १५० हून अधिक कॉलगर्ल्सचे रेट मिल्याची माहिती मालिवाल यांनी सांगितली. ही बाब अतिशय गंभीर आहे. यानंतर स्वाती मालिवाल यांनी दिल्ली पोलीस आणि जस्ट डायलला समन्स बजावले असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

राजधानी दिल्लीत स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याची माहिती महिला आयोगाला मिळाली होती. या ठिकाणी पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत असतात. सोशल मीडियाचा चांगल्या कामांसाठी वापर होत असला तरी त्याचा गैरवापर सुद्धा होत आहे. सोशल मीडियामुळे लोक एकमेकांशी जोडले जात आहेत. पण दूसरीकडे सोशल मिडीयाच्या माध्यमातून अवैध धंद्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. याचाच पुरावा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी दिला आहे. ट्विट करत त्यांनी आपल्या सोबत घडलेल्या या घटनेची माहिती दिली आहे.

 Swati Maliwal
पंजाबमध्ये आप'ला मोठा धक्का, आमदार रुपिंदर कौर रुबी यांचा राजीनामा

स्वाती मालीवाल यांनी ट्विटमध्ये लिहीले आहे की, "आम्ही जस्टडायलवर कॉल करून स्पा मसाजसाठी खोटी चौकशी केली, त्यानंतर आमच्या फोनवर 50 मेसेज आले, ज्यामध्ये 150 हून अधिक मुलींचे रेट (Callgirls) सांगण्यात आले. याबाबत मी जस्ट डायल आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला समन्स जारी केले आहे, या धंद्याला चालना देण्यासाठी जस्ट डायलची भूमिका काय आहे?" यासाठी हे समन्स पाठवण्यात आले आहेत.

जस्ट डायल आणि पोलिसांना समन्स

दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. जस्टडायल स्वतः या प्रकरणात एक पक्ष आहे. मी शक्य ती कारवाई करेन. दोषींना शिक्षा झाली पाहिजे. हे खपवून घेणार नाही, असेही स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.

स्वाती मालिवाल यांनी त्यांना व्हॉट्सअॅपवर आलेल्या नंबरवर केलेल्या संभाषणाचे पुरावे दिले आहेत.

स्वाती मालिवाल यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज आला - मसाज करायचा की सेवा

स्वाती यांनी उत्तर दिले - सेवा

पलीकडून मेसेज आला – शॉटचे 2000, पूर्ण सर्व्हिस होईल, पूर्ण सहकार्य करू, मुलगी सेम असेल, कोणतेही नखरे करणार नाही.

पुर्ण रात्रीसाठी 6000 रुपयामध्ये पूर्ण सेवा मिळेल. पूर्ण सहकार्य करू आणि कोणतेही नखरे करणार नाही. मुलगी सेम असेल,

यानंतर स्वाती यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर 30 फोटो पाठवण्यात आले, ज्यामध्ये वेगवेगळ्या मुलींचे फोटो होते.

यानंतर स्वाती मालीवाल यांच्या व्हॉट्सअॅप दुसऱ्या एका नंबरवरुन हाय लिहिलेला दुसरा मेसेज आला. त्याला उत्तर देताना त्याला वेगवेगळ्या मुलींचे 6 फोटो पाठवण्यात आले. यानंतर एकापाठोपाठ व्हॉट्सअॅप मेसेजेस आले.

सर एका शॉटसाठी तुम्हाला २५०० रुपये लागतील, तुम्हाला एका शॉटमध्ये दीड तासाचा वेळ मिळेल, सेवा करताना कोणतीही मुलगी कोणताही आडमुठेपणा करणार नाही,

पूर्ण रात्र 6500 खर्च येईल.

पूर्ण सेवा पूर्ण सहकार्य करु.

एसी रूम असेल, रूम वगैरे सगळं आमचं असेल, मुलगी सेम असेल.

आता तिसऱ्या क्रमांकावरून स्वाती मालीवाल यांच्या नंबरवर मेसेज आला - 'हाय.. डायलवरून चौकशी झाली.'

यानंतर स्वाती यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर खोटी चौकशी करताना पुरुष असल्याचे भासवून समोरच्याला स्पाचे नाव आणि पत्ता विचारला. तो म्हणाला, लोकेशन सांगा, मगच येईन, त्यानंतर त्याला पांडव नगर डी पार्क मदर डेअरीचा पत्ता सांगितला. मात्र याआधीही एकामागून एक अनेक मुलींची छायाचित्रे पाठवण्यात आली होती.

जस्ट डायलवर खोटी चौकशी केल्यानंतर स्वाती मालीवाल यांच्या फोनवर अशा व्हॉट्सअॅप मेसेजचा महापूर आला. दुसर्‍या नंबरवरून मेसेज आला- त्यातही एका मुलीचा फोटो आला.त्यानंतर आणखी दोन मेसेज आले.

एका शॉटचा दर तुम्हाला २५०० ओके लागेल

पूर्ण आनंद घेऊ, पूर्ण सहकार्य करू, पूर्ण सेवा करू.

पूर्ण रात्रीचा दर तुम्हाला 7000 लागेल, तुम्हाला चांगली सेवा मिळेल,

तुम्हाला सेवेत कोणतीही अडचण येणार नाही सर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com