सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी होणार 'लाईव्ह'

सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) घटनापीठासमोरील सर्वच सुनावणी लाईव्ह होणार आहे
Uddhav Thackeray CM Eknath Shinde News
Uddhav Thackeray CM Eknath Shinde News Sarkarnama

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या लाईव्हची सुरुवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे. सुरुवातीला हे लाईव्ह युट्यूबवर होणार आहे. नंतर सर्वोच्च न्यायालय लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी स्वतःचा प्लॅटफॉर्म विकसित करणार आहे. असे वृत्त 'बार अँड बेंच'ने दिले आहे.

२७ सप्टेंबरला महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. खरी शिवसेना (Shiv Sena) कोणाची यावर या दिवशी निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच न्यायालयाने घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी लाईव्ह करण्याच जो निर्णय घेतला आहे, तो या या सुनावणीपासून लागू होणार आहे.

Uddhav Thackeray CM Eknath Shinde News
“महाराष्ट्राच्या हक्काचे गुजरातला देणे, हाच शिंदे सरकारचा कार्यक्रम”

घटनापीठासमोरील खटल्यांच्या लाईव्ह सुनावणीचा निर्णय सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 'फूल कोर्ट मीटिंग'मध्ये झाला आहे. माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीवेळी लाईव्ह स्ट्रिमिंग केले होते. त्यावेळी ते नॅशनल इन्फॉर्मेटिंक्स सेंटर या शासकीय संस्थेच्या वेबसाईटवर दाखवण्यात आले होते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश लळित यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पेंडीग प्रकरणे निकाली काढण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी अवघ्या १३ दिवसांत पाच हजारांच्यावर प्रकरणे निकाली काढली आहे.

Uddhav Thackeray CM Eknath Shinde News
उद्धव ठाकरेंचा प्लॅन; संजय राठोडांना बालेकिल्ल्यातच बसणार मोठा धक्का?

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या १३ दिवसांत एकूण ५ हजार ११३ प्रकरणे निकाली काढली. न्यायालयामध्ये प्रकरणे निकाली काढण्यासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात कामांच्या दिवशी नियमीत प्रकरणाच्या सुनावणी दुपारी १०. ३० ते १ दरम्यान घेण्यात येत आहेत. अन्य दिवशी दुपारी २ ते ४ या वेळात इतर प्रकरणांच्या सुनावणी घेण्यात येत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com