ममतांना साहित्य अकादमी पुरस्कार : बंगाली लेखिका संतप्त ; पुरस्कार परत

"मुख्यमंत्र्यांना पुरस्कार देऊन तुम्ही चुकीचा पायंडा पाडत आहात. त्याच्या निषेधार्थ मी पुरस्कार परत करते आहे,"
ममतांना साहित्य अकादमी पुरस्कार : बंगाली लेखिका संतप्त ;  पुरस्कार परत
Ratna Rashid Banerjeesarkarnama

कोलकाता : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना बांगला साहित्य अकादमीने नुकताच साहित्य सेवा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारावरुन राजकारण तापलं आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये या विषयावरुन चांगलीच जुंपली आहे. अतिशय खोचक शब्दात ममता बनर्जी (Mamata Banerjee) यांची खिल्ली उडविण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध लेखिका रत्ना रशीद बॅनर्जी (Ratna Rashid Banerjee) यांनी ममता बॅनर्जी यांचा निषेध केला आहे. या पुरस्काराबाबत रत्ना बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 2019 मध्ये मिळालेला बांगला अकादमीचा 'अन्नद शंकर स्मारक सम्मान' त्यांनी परत केला आहे. अकादमीचे अध्यक्ष ब्रत्य बसू यांना पत्र लिहून त्यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Ratna Rashid Banerjee
राऊतांकडून माझे २५ लाख परत मिळवून द्या ; कंबोजांची संजय पांडेंना विनंती, पुरावा सादर

बांगला साहित्य अकादमीने 'ममता बॅनर्जी यांनी फार मोठी साहित्यसेवा केली आहे,'असे म्हणत ममता बॅनर्जी यांना हा पुरस्कार दिला आहे. यावरुन आता सरकार व साहित्य अकादमीवर काहींनी टीका करण्यास सुरवात केली आहे. ममता बॅनर्जी यांना दिलेल्या पुरस्काराच्या निषेधार्थ रत्ना रशीद बॅनर्जी यांनी त्यांना मिळालेला बांगला साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला आहे. यामुळे साहित्यक्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.

Ratna Rashid Banerjee
राज ठाकरेंना भाजपच्या एका खासदाराचा विरोध, तर दुसरे खासदार स्वागतासाठी सज्ज

रत्ना बॅनर्जी म्हणाल्या, "ममता बॅनर्जी या लेखिका आहेत. त्यांच्या काही कविता आणि कथा प्रसिद्ध देखील झाल्या आहेत.परंतु बांगला साहित्य अकादमीच्या पुरस्कार हा दीर्घकाळ साहित्यसेवा केलेल्या आणि दर्जेदार साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांना देण्याचा प्रघात आहे. हा प्रघात मोडून बांगला साहित्य अकादमीने ममता बॅनर्जी यांना पुरस्कार दिला आहे,"

"मुख्यमंत्र्यांना पुरस्कार देऊन तुम्ही चुकीचा पायंडा पाडत आहात. त्याच्या निषेधार्थ मी पुरस्कार परत करते आहे," असे रत्ना बॅनर्जी यांनी बांगला साहित्य अकादमीचे अध्यक्ष ब्रत्य बसू यांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांना पुरस्कार दिल्याच्या निषेधार्थ बांगला अकादमीचे सदस्य आनंद शंकर बंदोपाध्याय यांनी देखील अकादमीचा राजीनामा दिला आहे. यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या 900 कवितांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला होता, याला देखील बंदोपाध्याय यांनी विरोध केला होता.

ममता बॅनर्जी यांना देण्यास आलेल्या अकादमीचा या साहित्य सेवा पुरस्काराची सुरवात या वर्षीच करण्यात आली आहे. सोमवारी रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. ममता बॅनर्जी यांच्या 'कबीता बिटान'याला हा पुरस्कार मिळाला आहे. त्या या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. पण त्यांच्यावतीने ब्रत्य बसु यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.